Sharad Pawar: कोल्हेंच्या 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमाचा शरद पवारांनी केला रीव्ह्यू, म्हणाले...

शरद पवार यांनी पुण्यात सिनेमागृहात बसून डॉ.अमोल कोल्हे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित 'शिवप्रताप गरुडझेप' हा संपू्र्ण सिनेमा पाहिला आहे.
Sharad Pawar review On dr. amol Kolhe's 'Shivpratap Garudjhep'
Sharad Pawar review On dr. amol Kolhe's 'Shivpratap Garudjhep'Esakal

Sharad pawar: नेहमीच्या साध्या-सरळ भूमिकांपेक्षा ऐतिहासिक भूमिका साकारणं केव्हाही कठीणचं. कारण आपला इतिहास इतका मोठा आणि श्रीमंत आहे तो त्या पद्धतीनेच प्रेक्षकांपर्यंत जाणं म्हत्त्वाचं असतं. आणि फार कमी नट किंवा नट्या अशा आहेत ज्यांना या ऐतिहासिक भूमिका साकारण्याचं भाग्य लाभतं. डॉ. अमोल कोल्हे हे त्यापैकीच एक नाव. करिअरच्या अगदी सुरुवातीला डॉ. अमोल कोल्हे यांना नितिन देसाई यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलेलं आपण सर्वांनीच पाहिलं. पुढे अनेकदा कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले. छत्रपती संभाजी महाराजही साकारण्याचं भाग्य डॉ. अमोल कोल्हेंना लाभलं. आणि प्रत्येक वेळेस त्यांनी त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना योग्य न्याय दिला.

Sharad Pawar review On dr. amol Kolhe's 'Shivpratap Garudjhep'
Big Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात कोण आहे कानफाट्या? अपुर्वानं जाहीर केलं नाव...

आता पुन्हा एकदा सिनेमाच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर साकारताना आपण पाहतोय, ते म्हणजे त्यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या माध्यमातून. सिनेमाचं कौतूक तर होतंच आहे पण त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कोल्हेंची देखील भरपूर प्रशंसा होताना दिसत आहे. या सिनेमाच्या निमित्तानं डॉ.अमोल कोल्हेंशी पॉडकास्ट या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही संवाद साधला. तेव्हा त्या मुलाखतीत कोल्हेंनी आपल्या शिवप्रताप गरुडझेप सिनेमाची दस्तुरखुद्द शरद पवार यांनी समिक्षा केल्याचं सांगितलं. शरद पवार यांनी पुण्यात संपूर्ण सिनेमा पाहिला आणि त्यानंतर अगदी एखाद्या सिनेमाची समिक्षा करतात अशाच शब्दात कोल्हेंच्या सिनेमाविषयी ते व्यक्त झाले. नेमकं काय म्हणाले शरद पवार? हे ऐकण्यासाठी बातमीत आम्ही डॉ. अमोल कोल्हे यांची ती पॉडकास्ट मुलाखत जोडलेली आहे. ती नक्की ऐका.

शरद पवार हे स्वतः कलाप्रेमी आहेत. सिनेमाविषयी त्यांना असलेलं ज्ञान मोठं आहे. त्यांनी सिनेक्षेत्रासाठी अनेक चांगल्या गोष्टीही केल्या आहेत. त्यामुळे निश्चितच आपल्याला शरद पवार काय म्हणाले असतील बरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमाविषयी याबद्दल उत्सुकता असणारच. तेव्हा नक्की बातमीत जोडलेली डॉ.अमोल कोल्हे यांची ही पॉडकास्ट मुलाखत ऐका.

Sharad Pawar review On dr. amol Kolhe's 'Shivpratap Garudjhep'
Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात नवीन एन्ट्री? कोण असणार हा 'सुपरहिरो'?

अमोल कोल्हे हे आता केवळ अभिनेता म्हणून आपल्याला माहीत नाहीत तर एक राजकीय नेता म्हणूनही महाराष्ट्राला त्यांची एक वेगळी ओळख आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या निमित्तानं ईसकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकारण आणि मनोरंजन यावर दिलखुलास संवाद साधला आहे. अमोल कोल्हे यांनी या मुलाखतीत राजकारणातही मनोरंजन शिरतंय या प्रश्नावर नेमक्या कोणाच्या कानपिचक्या घेतल्या आहेत हे ऐकण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांची बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

Sharad Pawar review On dr. amol Kolhe's 'Shivpratap Garudjhep'
Priyanka Chopra: प्रियंकावर भडकलेयत नेटकरी, म्हणाले,'ढोंगी कुठली, हिला भारत सोडून...'

डॉ. अमोल कोल्हे यांनी याच मुलाखतीत राजकारण आणि मनोरंजन याचा सुरेख मेळ साधत काही थेट वक्तव्य केली आहेत. सध्या राजकारणातच खूप मनोरंजन घडतंय तेव्हा ते सिनेसृष्टीला किती घातक या प्रश्नावर तर डॉ.अमोल कोल्हे यांनी काही थेट वक्तव्य करत राजकीय नेत्यांसोबतच राजकीय वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांना देखील धारेवर धरलं आहे. याच मुलाखतीत राजकीय पदाचा त्याग करण्याविषयी देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते असं का म्हणाले आहेत ते पॉडकास्ट ऐकल्यावर कळेलच आपल्याला. डॉ.अमोल कोल्हे यांची ही दिलखुलास मुलाखत ऐकण्यासाठी आणि त्यांच्या सिनेमावार शरद पवारांनी केलेली समिक्षा ऐकण्यासाठी बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com