'पोंक्षेंनी मानले एकनाथ शिंदेंचे आभार'; 'त्या' पोस्टची रंगली चर्चा

शरद पोंक्षेंनी आपल्या 'दुसरं वादळ' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीची पोस्ट करताना एकनाथ शिंदेंचा केलेला उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बोट दाखवतोय.
Sharad Ponkshe post for Eknath shinde
Sharad Ponkshe post for Eknath shindeGoogle

आज महाराष्ट्राच्या(Maharashtra) राजकारणात(Politics) मोठी उलथापालथ सुरु आहे. शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि शिवसेना(Shivsena) नेते एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या बंडामुळे सध्या सामान्य कार्यकर्ताच नाही तर राजकारणाशी दुरुनही संबंध नसलेला माणूस हे असं कसं घडलं असा विचार करत संभ्रमात पडलाय. ४०-४५ आमदारांना आपल्या सोबत घेऊन जाणारे एकनाथ शिंदे सध्या जगाच्या नकाशावरही चर्चेत आले आहेत. यातनं काही जणांचा एकनाथ शिंदेंच्या या बंडाला पाठिंबा दिसतोय तर काही जणांचा विरोध. (Sharad Ponkshe post for Eknath shinde)

Sharad Ponkshe post for Eknath shinde
'राम तेरी गंगा मैली' ची मंदाकिनी परत येतेय; धमाकेदार एन्ट्रीनं वेधणार लक्ष

सोशल मीडियावर अनेकजण यासंदर्भात पोस्ट करुन तो पाठिंबा-विरोध दर्शवत आहेत. आता मराठी अभिनेता जे हिंदुत्ववादी आहेत,सावरकरांच्या विचारांचे निष्ठावंत सेवक आहेत अन् गेल्या काही महिन्यांपासून भाजपाचे समर्थक आहेत असं वाटू लागलंय त्या शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला नकळत पाठिंबा देणारी एक पोस्ट केलेली आहे,ज्याची सध्या चर्चा रंगली आहे.

Sharad Ponkshe post for Eknath shinde
'तन ,मन,धन शिवसेना; बाकी विचारधारा गेल्या खड्ड्यात'; किरण माने पोस्ट चर्चेत

अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,"कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले एकनाथ शिंदे साहेब, त्यांचा आणि माझा एक फोटोही छापलाय यात ! त्यांनी केलेल्या मदतीबद्दल यात सविस्तर लिहिलंय, आजच हे पुस्तक घरपोच मिळवा. सम्पर्क - ९९७००७७२५५

दुसरं वादळ

एका लढवय्या अभिनेत्याने कॅन्सरवर केलेली मात ! एका झुंजीची गाथा ! - शरद पोंक्षे

दोन महिन्यात दुसरी आवृत्ती !

Sharad Ponkshe post for Eknath shinde
'हेराफेरी 3' ची लवकरच घोषणा; 'कथानकात बदल,कलाकार...' काय म्हणाले निर्माते?

ही पोस्ट खरं तर पोंक्षे यांनी त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केली आहे. पण यात खरंतर एकनाथ शिंदेंचा आवर्जुन उल्लेख करण्याची फारशी गरज वाटत नाही. त्यात त्यांनी एका फोटोचा कोलाज करुन खास लिहिलं देखील आहे की, ''हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले,तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं...सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले''. शरद पोंक्षे यांनी अशा पद्धतीची पोस्ट करुन शिवसेनेच्या विरोधात तर पाऊल उचललेलं नाही नं. एकनाथ शिंदेच्या बंडाला समर्थन तर केलेलं नाही नं अशा चर्चेला मात्र यामुळे सुरुवात झाली आहे.

Sharad Ponkshe Post Viral
Sharad Ponkshe Post ViralFacebook

शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकानं मुद्दामहून लिहिलंय,'म्हणजे भाजप नाही तर शिवसेना तुमच्या पाठीशी उभी होती असं म्हणा ना'. तर एकानं थेट लिहिलंय,'या पोस्टमध्ये एक राजकीय अर्थ दडलाय'. कुणी लिहिलंय,'राजकीय घडामोडीत किमान आता तरी सहभाग घेऊ नका'. दुसऱ्या एकानं लिहिलंय,'तुम्हाला मदत करणारा माणूस कृतघ्न झाला'. ही अशा पद्धतीची पोस्ट करुन एका अर्थाने शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबाच दिला आहे हे उघडपणे स्पष्ट होतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com