Sharad Ponkshe: ज्या समाजाने त्याची आई हिरावली तोच मुलगा.. ज्ञानेश्वर माऊलींविषयी काय म्हणाले पोंक्षे..

ज्ञानेश्वर माऊली मोठे का? शरद पोंक्षे यांची ही पोस्ट बघाच..
Sharad Ponkshe shared post video about dnyaneshwar mauli
Sharad Ponkshe shared post video about dnyaneshwar maulisakal

sharad ponkshe: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे समाज माध्यमांवर सक्रिय असतात. इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर खूल्यापणे भाष्यही करत असतात.

पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच चांगलिच माहीत आहे. शरद पोंक्षे राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. त्यांच्या एका व्याख्यानातला व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली यांच्यावर महत्वाचे भाष्य केले आहे.

(Sharad Ponkshe shared post video about dnyaneshwar mauli)

Sharad Ponkshe shared post video about dnyaneshwar mauli
Natya Parishad Election Result: नाट्य परिषद निवडणुकीत प्रशांत दामले विजयी! कांबळींचा पराभव..

शरद पोंक्षे सध्या राज्यभरात हिंदुत्वाविषयी व्याख्यान देत आहेत. याच व्याख्यानात पोंक्षे काशी छत्रपती शिवाजी महाराज, कधी संभाजी महाराज, सावरकर, विवेकानंद अशा महापुरुषांचे संदर्भ देत असतात. नुकत्याच झालेल्या एका व्याख्यानात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा संदर्भ दिला. यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर माऊली मोठे का? यावर भाष्य केले आहे. या व्हिडिओ शरद पोंक्षे आपल्या अकाऊंट वरुन पोस्ट केला असून तो सध्या बराच चर्चेत आहे.

या व्हिडिओ मध्ये शरद पोंक्षे म्हणतात, ''ज्या समाजांचेत्यांचे आई वडील हिरावून घेतले.. वर त्यांना समाजात घेतलंच नाही, त्यांची फसवणूक केली.. समाजामध्ये स्थान दिलं नाही.. उलट वाळीत टाकलं.. आता त्या अख्ख्या समजावर सूड उगवण्याचं काम खरतर त्या चार मुलांनी करायला हवं होतं.पण तसं झालं नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सूड नाही घेतला. एवढंसं ते पोरगं.. ज्या समाजाने त्याची आई हिरावली, त्याची माऊली हिरवून घेतली तो मुलगा त्या अख्ख्या समाजाची माऊली झाला,'' असे पोंक्षे म्हणाले.

शरद पोंक्षे यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं सांगितलेलं ही थोरपण नेटकऱ्यांना खूप भावालं आहे. या व्हिडिओची सध्या बरीच चर्चा असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. शरद पोंक्षे आपल्या भाषणातून असे अनेक प्रेरणादायी विचार मांडत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com