
Sharad Ponkshe: त्याने टोपी काढली तर मला जानवं काढावंच लागेल.. शरद पोंक्षे यांची 'ती' व्हिडिओ चर्चेत
sharad ponkshe: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते शरद पोंक्षे सध्या बरेच चर्चेत आहेत. त्यांची वादग्रस्त विधाने आणि राजकीय मतं यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले असते. ते स्वतः समाज माध्यमांवर सक्रिय असतात.
इतकच नाही तर ते अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर निर्भीडपणे भाष्यही करत असतात. पोंक्षे यांचे विचार, हिंदुत्वाप्रती असलेलं प्रेम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर असलेली निष्ठा सर्वांनाच माहीत आहे.
शरद पोंक्षे अभिनयासोबतच राष्ट्रप्रेमावर व्याख्यान देत असतात. हिंदुत्व आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदुत्व म्हणजे काय, हिंदू ही ओळख कधी दाखवली पाहिजे यावर सडेतोड भाष्य केलं आहे.
(Sharad Ponkshe shared video about hindu hinduism identity on muslim christian yeshu alhah)
शरद पोंक्षे यांनी नुकताच त्यांच्या एका व्याख्यानातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. ज्यामध्ये हिंदू ही ओळख कधी दाखवायला हवी यावर ते बोलले आहेत. हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.
यामध्ये पोंक्षे म्हणाले आहेत, ''सावरकर म्हणतात, 33 कोटी देव देवतांची पूजा करणारा आमचा हिंदू समाज आहे. त्याच्यात एक अल्हा आणि एक येशूची भर पडली तर आमचा फायदाच आहे तोटा नाही. म्हणूनच वसुधैव कुटुंबकम ची भावना आमच्या मनात आहे.म्हणून आम्ही सर्वांना सामावून घेतो.पण सामावून घेतल्या नंतर जर हळूहळू तुम्ही तुमची वेगळी ओळख दाखवू लागलात तर आम्हालाही आमची ओळख दाखवावी लागेल.. आम्हाला गप्प बसून चालणार नाही.''
पुढे ते म्हणतात, ''हा माझा धर्म आहे, तो मला श्रीकृष्णाने शिकवला आहे, प्रभू रामचंद्राने शिकवला आहे. साम दाम दंड आणि मग भेद.. म्हणून मी संभाजीनगरला एक वाक्य म्हंटलं.. मी प्रत्येकाकडे माझ्या धर्माप्रमाणे माणूस म्हणूनच बघतो. मी कधीही माझी हिंदू ही ओळख सुरवातीला दाखवत नाही. हा पण जर त्याने टोपी काढली तर मला जानवं काढावंच लागेल.''
''बाबा..मी येतो तुझ्याकडे हात मिळवायला.. तु मनुष्य आहे मी मनुष्य आहे.. मी माणुसकी धर्म पाळणारा आहे.. तु माणुसकी धर्म पाळ.. पण तु जर म्हणाला नाही मी मुसलमान आहे, नाही मी ख्रिश्चन आहे..तर मगहो मग मीही हिंदू आहे..'' अशा कडक शब्दात त्यांनी आपले परखड मत मांडले आहे.