Sharad Ponkshe: छत्रपती संभाजी महाराजांसोबत भयंकर अत्याचार सहन करणारा कोण होता हे लपवता कशाला..

शरद पोंक्षे यानी आपल्या व्याख्यानात एका मोठ्या घटनेचा खुलासा केला.
sharad ponkshe shared video he talks about chhatrapati sambhaji maharaj and kavi kalash last moment of torture
sharad ponkshe shared video he talks about chhatrapati sambhaji maharaj and kavi kalash last moment of torturesakal
Updated on

Sharad Ponkshe on chhatrapati sambhaji maharaj: शरद पोंक्षे केवळ अभिनेता नाहीत , एक वक्ता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. सावरकरांच्या विचारांना पोंक्षे पुजतात असं म्हटलं तर नक्कीच चुकीचं ठरणार नाही. शरद पोंक्षे यांची भाषणं नेहमीच सावरकरांच्या विचारधारेनं प्रेरित असतात.

त्यांच्या स्वतःच्या युट्युब चॅनेलवरही ते आपली ही भाषणं पोस्ट करतात अन् सोशल मीडियावर ती अनेकदा व्हायरल होतात, बऱ्याचदा तर वादातच सापडतात. नेटकरी अनेकदा पोक्षेंच्या विचारांचे समर्थन करतात तर कधी त्यांच्यावर थेट निशाणा साधतात.

आता छत्रपती संभाजी महाराजांवरील एका भाषणाच्या क्लीपमुळे पोंक्षे पुन्हा चर्चेत आलेयत. या भाषणात पोंक्षें यांनी एका मोठ्या घटनेचा खुलासा केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

(sharad ponkshe shared video he talks about chhatrapati sambhaji maharaj and kavi kalash last moment of torture)

sharad ponkshe shared video he talks about chhatrapati sambhaji maharaj and kavi kalash last moment of torture
Kiccha Sudeep: हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून नाकारणारा अभिनेता किच्चा सुदीप भाजपमध्ये!

शरद पोंक्षे सध्या राज्यभरात हिंदू धर्म आणि सावरकरांचे विचार यावर व्याख्यान देत असतात. याच व्याख्यानातील हा एक व्हिडिओ आहे. ज्यामध्ये त्यांनी संभाजी महाराजांना ज्या अमानुष पणे मृत्यू दिला त्या घटनेचा उल्लेख केला आहे. पण ते करताना त्यांनी एक मोठी बाब अधोरेखित केली आहे.

या व्हिडिओ मध्ये पोंक्षे म्हणतात, '..का संभाजी महाराजांना भीती नाही वाटली, कोण होता तो.. ज्यावेळी संभाजी महाराजांना अनंत यातना, छळ भयंकर क्रौर्य देऊन संपवलं.. तेव्हा त्यांच्याबरोबर तितक्याच यातना देऊन अजून एकाला संपवल.. चामडी सोलली, डोळ्यामध्ये शिगा घातल्या, नख काढली.. का तर मुसलमान हो म्हणून.. तो पण झाला नाही. त्यानेही हिंदू धर्म सोडला नाही.'

पुढे ते म्हणतात, 'या यातना त्याच्या सोबत आणखी एका माणसाला दिल्या जात होत्या. त्याच नाव आहे कवि कलश.. तो ब्राह्मण आहे.. पण हे कुणी बोलणार नाही. यातना तेवढ्याच दिलेल्या आहेत, पण त्यांनी धर्म सोडला नाही. हिंदू धर्मासाठी जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं तर मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं.'

शरद पोंक्षे बऱ्याचदा हिंदुत्वावर बोलताना ब्राह्मण समाजाला होणारा त्रास, त्यांना कसं डावललं जातं यावरही बोलत असतात. या व्याख्यानातून इतिहासाने एका ब्राह्मण कवीचा त्याग कसा समाजापर्यंत पोहोचू दिला नाही, याची स्पष्टता दिली आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com