: 'स्वातंत्र्याचं श्रेय कोणाचं?' गांधी की सावरकर...शरद पोंक्षे स्पष्टच बोलले Sharad Ponkshe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Ponkshe Statement video Viral On social media, Gandhi Or Sawarkar

Sharad Ponkshe: 'स्वातंत्र्याचं श्रेय कोणाचं?' गांधी की सावरकर...शरद पोंक्षे स्पष्टच बोलले

Sharad Ponkshe: शरद पोंक्षे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक घट्ट समीकरण आहे. सावरकरांच्या विचारांनी चालणारे शरद पोंक्षे यामुळे अनेकदा वादात सापडतात. अनेक लोकांना त्यांचे स्पष्ट विचार खटकतात. पण शरद पोंक्षे मात्र आपल्या विचारांपासून मागे हटलेले आपण कधीच पाहिलेले नसतील. ते उत्तम वक्ता आहेत,आणि त्यांच्या भाषणातील सडेतोड विचारांनी गाजलेले कार्यक्रम आपण नेहमीच पाहतो.

त्यांच्या राष्ट्रीय स्वाहा या चॅनेलवरनं नेहमीच त्यांची भाषणं प्रसारित केली जातात. अनेकदा उत्साहानं संचारलेली ही भाषणं सोशल मीडियावर चर्चेस कारणीभूत ठरतात. अर्थात,शरद पोंक्षे यांची सर्वच भाषणं सावरकरांच्या विचारांना धरुन असतात. आता पुन्हा एकदा शरद पोंक्षे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे.

या व्हिडीओत शरद पोंक्षे यांनी 'स्वातंत्र्याचं श्रेय कोणाचं?' या महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे. ते सावरकरांचा किस्सा या भाषणातून सांगताना दिसत आहेत. पोंक्षे म्हणाले,''सावरकरांना कोणीतरी विचारलं,स्वातंत्र्याचं श्रेय कोणाला द्याल तुम्ही?', गांधींच्या कार्याला की तुम्ही जो क्रांतीकारकांचा मार्ग स्विकारलाय त्याला . तेव्हा सावरकर म्हणाले,'फक्त हे दोघेच नाहीत, ज्यांनी-ज्यांनी आपापल्या कुवतीनुसार या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलंय अशीही काही माणसं असतील, मग ती माणसं घरात बसून घाबरत-घाबरत देशाच्या स्वातंत्र्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतील तरी त्यांचेही देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाचे योगदान असेल''. शरद पोंक्षेंचा हा व्हिडीओ सध्या जोरदार चर्चेत आहे. त्या व्हिडीओची लिंक इथे बातमीत जोडली आहे.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

शरद पोंक्षें हे तसं पाहिलं तर वादग्रस्त व्यक्तिमत्त्व. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राहूल गांधी यांच्या विरोधात एक व्हिडीओ पोस्ट केलेला, जो जोरदार चर्चेत आला होता. राहूल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्याविरोधात पोंक्षे यांनी त्या व्हिडीओतून संताप व्यक्त केला होता. राहूल गांधी सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत. त्या दरम्यान केलेल्या वक्तव्यात राहूल गांधी म्हणाले होते की, 'सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती'. त्यावरनं भडकलेल्या शरद पोंक्षेंनी थेट अंदमानातून राहूल गांधींवर टीका केली होती. तसंच, 'राहूल गांधींनी सावरकर राहिले त्या कोठडीत एक दिवस तरी राहून दाखवावे', असं आव्हान देखील केलं होतं.