शरयूला मराठी सिनेइंडस्ट्रीचा पाठिंबा 

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

ऍण्ड टीव्हीवरील "द व्हॉइस इंडिया'च्या "सीझन 2' मधील स्पर्धक शरयू दातेने सुरेल स्वराने प्रेक्षक व प्रशिक्षकांचे मन जिंकले आहे. शरयूने या शोमध्ये सहभाग घेण्यापूर्वी मराठी चित्रपटातील बरीच गाणी गायली आहेत. आता तिला मराठी सिने इंडस्ट्रीचाही भरभरून पाठिंबा मिळत आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, "रमा माधव' चित्रपटातील गाणी कोण गाणार, यावर माझी आमच्या संगीत दिग्दर्शकाशी चर्चा सुरू होती. तेव्हा त्याने शरयूला माझ्यासमोर उभे केले. मी तिचा आवाज ऐकून थक्क झाले होते. शरयूने अशाचप्रकारे कायम गात राहावे.' गायिका वैशाली सामंत व अवधुत गुप्तेनेही शरयूला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: sharayu date marathi industr back up