किशोर कुमार यांच्या'ओ मेरे दिल के चैन' गाण्याचा व्हिडिओ शेअर करत आयुषमानने दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेछा....

संतोष भिंगार्डे
Tuesday, 4 August 2020

आयुषमान खुराना हा एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखला जातो. बऱ्याच वेळा त्याने आपल्या पोस्ट्समधून त्याच्या प्रेरणास्थानांची ओळख करून दिली आहे.

 मुंबई ः आयुषमान खुराना हा एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखला जातो. बऱ्याच वेळा त्याने आपल्या पोस्ट्समधून त्याच्या प्रेरणास्थानांची ओळख करून दिली आहे. त्यातलेच त्याचे एक प्रेरणास्थान म्हणजे गायक-अभिनेते किशोर कुमार. आयुषमानने किशोर कुमार यांना कशा प्रकारे आपला आदर्श मानले आहे हे त्याने वारंवार सांगितले आहे.

 मोदींवर गोध्रा, शहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप; आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न

आज किशोर कुमार यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त आयुषमानने दिग्गज गायक-अभिनेता किशोर कुमार यांचे  'ओ मेरे दिल के चैन' हे सुंदर गाणे आयुषमान त्याच्या सुरेल आवाजात गात असतानाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला.

आयुष्मानने काही वर्षांपूर्वी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि अलीकडेच त्याला त्याच्या संग्रहात तो मिळाला.

महामुंबईत आज दिवसभर पावसाचे थैमान; बहुतांश भाग पाण्याखाली; रेड अलर्ट कायम 

आयुष्मान म्हणतो, “मी किशोर कुमार यांचा खूप मोठा चाहता आहे आणि हे गाणे माझ्या सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. मी माझे काम करत असतानाही दिवसभर हे ऐकत राहू शकतो. किशोर कुमारांचा आवाज सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा आहे. संगीताचे सगळे प्रकार  मग ती भावपूर्ण गाणी असो किंवा दुःखी गाणी असो ते सुरेख गाऊ शकत असत. आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा होता  आणि त्याची विनोदबुद्धीही फार कमालीची होती."

शुक्रवारपासून मुंबईतील महाविद्यालये ऑनलाईन सुरु; वाचा सविस्तर

आयुषमानने शेअर केलेल्या 'ओ मेरे दिल के चैन' या गाण्याचा व्हिडिओसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडून इंटरनेटवर प्रचंड हिट ठरतोय.

----------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharing the video of Kishore Kumar's song 'O Mere Dil Ke Chain', Ayushman wished him a happy birthday