अश्नीर ग्रोव्हरनी सलमानच्या 'बिग बॉस' ची इज्जतच काढली; म्हणाले,'या शो मधील सगळेच...' Shark Tank Ashneer grover rejeted bigg boss 16 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Shark Tank Ashneer grover rejeted bigg boss 16 now says only unsuccessful people go in bigg boss

Ashneer Grover: अश्नीर ग्रोवरनी सलमानच्या 'बिग बॉस' ची इज्जतच काढली; म्हणाले,'या शो मधील सगळेच...'

Ashneer Grover: सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस १६ ने तब्बल २ महिन्यानंतर अखेर टीआरपीच्या यादीत आपलं नाव नमूद केलं आहे. बिग बॉस १६ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे, दर दोन दिवसांनी या शो ला नवीन रंजक वळण मिळत आहे. शो विषयी अनेक सेलिब्रिटी आपलं मत व्यक्त करताना दिसतात आणि लगोलग ते सारं सोशल मीडियावर व्हायरल झालेलंही दिसतं. यातच आता शार्क टॅंकच्या अश्नीर ग्रोवरनं बिग बॉसला नावं ठेवल्याचं समोर आलं आहे. ग्रोवर हे शार्क टॅंक इंडियाच्या पहिल्या भागात सहभागी झाले होते. दुसऱ्या सिझनमध्ये मात्र ते परतणार नाहीत असं कळतंय.(Shark Tank Ashneer grover rejeted bigg boss 16 now says only unsuccessful people go in bigg boss)

हेही वाचा: Bollywood: 'Safe Sex' वर भाष्य करणार रकुल प्रीत सिंग, 'छतरीवाली' सिनेमाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष..

अश्नीर ग्रोवर यांनी बिग बॉसविषयी बोलताना जवळपास त्या शोची इज्जतच काढली आहे. सध्या ग्रोवर आपल्या 'दोगलापन' या नव्या पुस्तकाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना शार्क टॅंक इंडियाच्या दुसऱ्या भागात सहभागी न होण्याविषयी विचारले गेले होते. त्या दरम्यान ग्रोवर यांनी सलमान खानच्या बिग बॉस १६ या रिअॅलिटी शो चे देखील आपल्याला निमंत्रण मिळाले होते असा खुलासा केला. शार्क यांनी शो वर खूप टीका केली आणि तिथे केवळ करिअरमध्ये अयशस्वी असलेले लोक जातात असं देखील म्हटलं. आपण या शो मध्ये कधीही सहभागी होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Hardeek-Akshaya Wedding: राणादा ला हळद लागली, पाठक बाईंची मेहेंदी सजली...

या मुलाखतीत ग्रोवर म्हणाले,''तुम्ही मला त्या शो मध्ये कधीच पाहणार नाही. त्या शो मध्ये केवळ अयशस्वी लोक जातात,यशस्वी लोक नाही...एक काळ होता जेव्हा हा शो मी पहायचो पण आता त्याचा दर्जा घसरला आहे. या शो च्या टीमनं मला संपर्क केला होता,मी लगेच सॉरी म्हणत माझा नकार कळवला''. शार्क टॅंक इंडियातून ग्रोव्हरनी काढता पाय का घेतला, यावर उत्तर देताना ते हसत म्हणाले की,''एखादी गोष्ट परवडायला केवळ पैसा असणं गरजेचं नसतं तर त्यासाठी तेवढी धमक अन् पात्रताही लागते''.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

याआधी अश्नीर ग्रोवर चर्चेत आले होते जेव्हा त्यांची को-शार्क नमिता थापरनं शो सोडण्यावरनं त्यांची खिल्ली उडवली होती. नमिता थापरनी लिहिलं होतं,''केवळ एक व्यक्ती शो ला मोठं करु शकत नाही किंवा त्याला बंदही करू शकत नाही...मी नाही किंवा कोणीच नाही...हा शो आमच्यासारख्या व्यावसायिक तसंच नोकरी करण्यांवर आधारित आहे...राष्ट्रातील अनेक गोष्टींच्या निर्मिती मागची सुंदर कहाणी सांगणारा आहे..तेव्हा नको त्या गोष्टींना प्राधान्य न देता तो शो उभा रहावा म्हणून मेहनत घेणाऱ्या टीमच्या कष्टांवर लक्ष द्या''.