दिल, दोस्ती : मैत्रीचा अतूट धागा!

दुनिया गोल आहे असं म्हणतात, ते अगदी खरं. शशांक केतकर व अनुजा साठे या दोघांनीही याचा अनुभव घेतला आहे.
shashank ketkar and anuja sathe
shashank ketkar and anuja sathesakal
Summary

दुनिया गोल आहे असं म्हणतात, ते अगदी खरं. शशांक केतकर व अनुजा साठे या दोघांनीही याचा अनुभव घेतला आहे.

- शशांक केतकर, अनुजा साठे

दुनिया गोल आहे असं म्हणतात, ते अगदी खरं. शशांक केतकर व अनुजा साठे या दोघांनीही याचा अनुभव घेतला आहे. हे दोघंही पुण्याचे. अनुजाचा मामा व शशांकचे वडील खूप जुने व खास मित्र. शशांक आणि अनुजा लहान असताना त्यांची एकदा भेट झाली. बालपणीच्या त्या भेटीनंतर ते एकमेकांसमोर आले ते थेट ‘सुवासिनी’ मालिकेच्या सेटवर. या मालिकेत एकत्र काम करतानाच त्यांच्यात छान मैत्री झाली.

शशांकनं सांगितलं, ‘अनुजा अतिशय समजूतदार, मेहनती व जिद्दी आहे. मनोरंजनसृष्टीत टिकाव धरून ठेवण्यासाठी आवश्‍यक असा तिचा स्वभाव आहे. इथं तुम्हाला तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडावं लागतं, काही वेळा तुम्हाला तुमच्या म्हणण्यावर ठाम राहावं लागतं, तर काही वेळा थोडं नमतं घ्यावं लागतं; अनुजा अगदी तशीच आहे. तिच्यातला आत्मविश्वास आणि आपल्याला कुठलीच गोष्ट येत नाही असं नाही हे स्वतःला सांगत राहणं या दोन गोष्टी मला खूप भावतात व त्या मला आत्मसात करायला आवडतील. तिनं मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतल्यावर हिंदीचे रीतसर धडे घेतले. तिच्या ‘एक थी बेगम’ या सीरिजचे दोन्ही सीझन प्रचंड गाजले, प्रेक्षकांना अनुजाचं काम आवडलं; हे सगळं तिनं घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. त्यासोबतच लोकांशी संपर्क करून त्यांच्याशी जोडलेलं राहणं अनुजाला खूप छान जमतं. हा गुण मला तिच्याकडून शिकायला आवडेल. अनुजा एक खूप चांगली सहकलाकार आहे. तिला भेटल्यावरच आपल्याला लगेच जाणवतं, की हिच्याबरोबरचं काम उत्तमच होणार आहे. तिनं केलेलं ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातील काम मला फार आवडलं. आमचं अधूनमधून बोलणं होत असतं. एकमेकांचं काम पाहिल्यावर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्ही एकमेकांना आवर्जून देतो. त्यामुळं आमच्यातलं बॉण्डिंग जसंच्या तसं टिकून आहे.’’

अनुजा शशांकबद्दल बोलताना म्हणाली, ‘शशांकचा स्वभाव खूप साधा, मनमिळाऊ, समजूतदार आहे. तो खूप कष्टाळू आहे. इंजिनिअर झाल्यावर परदेशातून शिक्षण घेऊन तो पुन्हा भारतात आला व इथं आल्यावर त्यानं त्याचं क्षेत्रच पूर्णपणे बदललं. ही त्यानं घेतलेली मोठी उडी होती. त्यावेळी ठामपणे त्यानं काही गोष्टी ठरवल्या त्या तो आजपर्यंत मनापासून पूर्ण करतोय; यासाठी मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आवडती गोष्ट मनापासून करायला हवी, असं आपल्याला आतून वाटतं, ते कायम करत राहणं हा शशांकमधला एक खूप महत्त्वाचा गुण घेण्यासारखा आहे. तो खूप निर्मळ मनाचा आहे. पोहणं व प्रणीप्रेम सोडल्यास आमच्या बाकी सगळ्या आवडीनिवडी अगदी वेगवेगळ्या आहेत. शशांककडं एक जर्मन शेफर्ड होती, तिचं नाव होतं मॅगी आणि आमच्या घरी चार ल्हासाप्सो आहेत. त्यांच्यामुळंही आम्ही खूप कनेक्ट झालो. तसंच आम्ही दोघंही आमच्या कामाच्या आणि मैत्रीच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहोत. एकत्र काम करत असताना आम्ही भरपूर धमाल केली.

कामाच्या वेळी तो त्याचं दोनशे टक्के देऊन काम करतो, तसंच दोन सिन्सच्यामध्ये मजामस्तीही करतो. त्याने ‘गोष्ट तशी गमतीची ’नाटकात साकारलेली भूमिका मला अतिशय आवडली. दोघांच्या कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आमचं वरचेवर बोलणं किंवा भेटणं होत नाही. पण आम्ही बोलतो तेव्हा आम्हाला मुळातून सुरुवात करावी लागत नाही. ‘सुवासिनी’नंतर आम्ही एकत्र जरी काम केलेलं नसलं, तरी आमचं बॉण्डिंग कायम आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आम्हाला एकत्र काम करायला नक्कीच आवडेल आणि त्याची मी वाट बघते आहे.’

(शब्दांकन - राजसी वैद्य)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com