चला चला विरोध करा.. 'हर घर तिरंगा' मोहिमेवर शशांक केतकरचं मोठं विधान.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shashank ketkar shared sarcastic post about mission har ghar tiranga

चला चला विरोध करा.. 'हर घर तिरंगा' मोहिमेवर शशांक केतकरचं मोठं विधान..

होणार सून मी ह्या घरची', 'हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)अभिनयसोबतच सामाजिक, राजकीय विषयावर देखील भाष्य करत असतो. यावरून अनेकदा त्याला ट्रॉल देखील केले आहे. परंतु त्याने कायमच आपली भूमिका हि परखडपणे मांडली आहे. आता त्याने पुन्हा एकदा मोठ्या मुद्द्याला हात घातला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरु करण्यात आलेल्या 'हर घर तिरंगा' या मोहिमेबाबत त्याने भाष्य केले आहे. या मोहिमेला विविध स्तरातून विरोध होत असतानाच शशांकने मात्र विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

(shashank ketkar shared sarcastic post about mission har ghar tiranga)

यंदा भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात मोठ्या उत्साहात साजरा व्हावा या उद्देशाने येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशात आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यानुसार 'हर घर तिरंगा' ही मोहिम राबवण्यात येत आहे. काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे तर काही राजकीय नेत्यांनी आणि विचारवंतांनी याला कडाडून विरोध केला आहे.

पण या विरोध करणाऱ्यांना शशांकने अत्यंत उपरोधिक भाषेत उत्तर दिले आहे. शशांक म्हणतो, 'चला चला विरोध करा.... सगळ्या बक्कळ पैसे कमावणाऱ्या celebrities ना घेऊन केलेल्या गाण्याला विरोध करा . यातून अजिबात inspire वगैरे तर होऊच नका. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुध्धा एक ऊर्जा मिळते वगैरे सगळं खोटं आहे. जुन्या पिढ्यांनी जी आत्ता पर्यंत वाट लावली, तीच देशासाठी योग्य आहे. Young, वेगळा दृष्टिकोन वगैरे काही नसतं.'

पुढे तो म्हणतो. 'भारताचा झेंडा घरो घरी असावा.... ही positive भावना १४० कोटी लोकांच्या मनात रुजावी या साठी आपल्या सरकारला campaign करावं लागतं ??? जगातल्या प्रत्येक देशात काही ना काही problems आहेत, पण जेव्हा जगासमोर मांडलेल्या त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा ते सगळे कट्टर होतात. देशासाठी पेटून उठतात. आपण केव्हा कट्टर भारतीय होणार ? आपण केव्हा आपल्या देशाचा विचार करणार?...' शशांकची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: Shashank Ketkar Shared Sarcastic Post About Who Oppose Mission Har Ghar Tiranga

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shashank Ketkar
go to top