
shashank ketkar : होणार सून मी ह्या घरची', 'हे मन बावरे', 'पाहिले न मी तुला' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)अभिनयसोबतच सामाजिक, राजकीय विषयावर देखील भाष्य करत असतो. यावरून अनेकदा त्याला ट्रॉल देखील केले आहे. परंतु त्याने कायमच आपली भूमिका हि परखडपणे मांडली आहे. आता त्याने पुन्हा एकदा मोठ्या मुद्द्याला हात घातला आहे. सध्या मुंबईकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र खड्ड्यांच्या त्रासाने वैतागला आहे. शशांकनेही मुंबईत त्यांच्या घराशेजारील रस्त्यांची अस्वस्था दाखवत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे त्याने राजकारणावरही परखडपणे भाष्य केले आहे. एवढेच तर त्याने सर्वांच पक्षांवर निशाणा साधला आहे.
शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने मलाड परिसरातील रस्त्यांची अवस्था दाखवलीये. एवढेच नाही तर लोकांच्या जीवाशी, त्यांच्या महागड्या गाड्यांची कसा खेळ सुरू आहे, हे देखील त्याने सांगितले आहे. यावेळी त्याने राजकारणी, सत्ताधारी, विरोधक ते दिल्लीत बसलेल्या नेत्यांनाही खडेबोल सुनावले. 'राजकारण बाजूला ठेवून सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन रस्त्यांसाठी काहीतरी करा. कारण यामुळे लोकांचा जीव जातोय कृपा करुन काहीतरी करा', अशा आशयाचा व्हिडीओ शशांकने शेअर केला आहे.
(shashank ketkar shared video got angry reaction on the bad condition of roads and potholes nsa95 )
सोबत एक कॅप्शन त्याने दिले आहे. त्यात काही मुद्दे देऊन तो म्हणतो..
मुद्दा क्र. 1 - तू मूळचा पुण्याचा आहेस... तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या
मुद्दा क्र. 2 - हा video मुळात कोणाच्या तरी support साठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत. हे देशातल्या सगळ्या roads बाददल माझं म्हणण आहे.
मुद्दा क्र 3 - रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा हे imagine करून बघाव की ते त्यांच्या लहान मुला मुलीला या international school मध्ये सोडायला bike वरून आले आहेत किंवा म्हातार्या आई बाबांना डॉक्टर कडे घेऊन आले आहेत किंवा बायको बरोबर आहेत किंवा अगदी एकटे आहेत आणि ती तुमची bike या खड्यात अडकून बंद पडली, तुमचा तोल गेला, मागून bus आली आणि तुमच्या डोक्याचा चुरा करून गेली! एकदा imagine करा ही भीती!
मुद्दा क्र 4- उत्तम सोयी आणि उत्तम रस्ते मिळाल्यावर ते नीट वापरण्याची जबाबदारी आपली नागरिकांची सुद्धा आहे.
मुद्दा क्र 5- चला एक movement सुरू करु. हा चलता है attitude संपला पाहिजे! तुम्हाला असे रस्ते दिसले तर त्याचा Video post करा. मला आणि योग्य त्या authorities ना त्यात tag करा आणि हे करताना #YeNahiChalega हा hashtag वापरा.'
या व्हिडिओच्या माध्यमातून शशांक नए अत्यंत पोटतिडकीने खड्ड्यांचा प्रश्न मांडला आहे. यावेळी त्याने लोकांना हे असले प्रकार सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देखील दिले आहे. त्याने या व्हिडिओतून 'यए नही चलेगा' ही मोहिमच उभारली आहे. शशांकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी आपल्या विभागातील खड्ड्यांचे प्रश्न मांडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.