Sheezan Khan: तुच माझा 'चांद'! रमजान ईद निमित्त शिझानला आठवली तुनिषा...पोस्ट व्हायरल

तुरुंगातून सुटल्यापासून शीजान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
sheezan khan and tunisha sharma
sheezan khan and tunisha sharma Sakal

तुरुंगातून सुटल्यापासून शीजान खान सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि आपल्या भावना कवितेच्या माध्यमातून शेअर करत आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड तुनिषा शर्माला आठवून तो कधी फोटो, व्हिडिओ तर कधी कविता लिहित राहतो. नुकतेच शीजानने तुनिषाला 'चांद रात'मध्ये चांद म्हणत विश केले आहे.

काल रात्री 'चांद रात' होती. या खास प्रसंगी शीझान खानने आपल्या प्रियजनांना चांद रातच्या शुभेच्छा दिल्या आणि तुनिषा शर्माला चांद असे संबोधले. शीझानने इन्स्टा स्टोरीवर एक नोट लिहिली,“जो दूर है नजर से उस चांद को भी चांद मुबारक!” याशिवाय शीजान खानने एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने 'अली बाबा: दास्तान ए काबुल'च्या सेटवरील अनेक जुने फोटो शेअर केले आहेत. शेवटच्या फोटोत तो तुनिशासोबत हसताना दिसत आहे.

sheezan khan and tunisha sharma
Jaya Bachchan: 'बस झालं आता...' जया बच्चन पुन्हा पापाराझींवर भडकल्या, व्हिडीओ व्हायरल
sheezan khan
sheezan khanSakal

तुनिषा शर्माने २४ डिसेंबर २०२२ रोजी 'अली बाबा'च्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येच्या १५ दिवस आधी तुनिशा आणि शीजानचे ब्रेकअप झाले होते, त्यामुळे अभिनेत्री खूप नाराज होती. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी या अभिनेत्रीच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांसह संपूर्ण देश हादरला.

आत्महत्येनंतर तुनिषाच्या आईने शीजान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्याला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्याची सुटका झाली. तेव्हापासून तो त्याच्या चाहत्यांशी जोडला गेला आहे.

'अली बाबा'मध्ये शीजान खानच्या जागी अभिषेक निगमची निवड करण्यात आली आहे. मात्र, चाहत्यांना अजूनही शीजानला अली बाबाच्या भूमिकेत पाहायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com