esakal | 'बाथटब'मध्ये फनी डान्स, फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

shehnaaz gill brother shehbaz badesha bath giorgia andriani

'बाथटब'मध्ये फनी डान्स, फोटो व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री शहनाज गिलची गोष्टच वेगळी आहे. ती तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. खासकरुन आपल्या फॅशनमुळे आतापर्यत शहनाजनं हजारो फॅन फॉलोअर्स जोडले आहेत. त्यामुळे शहनाज कायम लाईमलाईटमध्ये राहणारी सेलिब्रेटी आहे. असे म्हणावे लागेल. आता तिची एक पोस्ट सोशल मीड़ियावर व्हायरल झाली आहे. त्यात तिचा भाऊ हे दोघेही वेगवेगळ्या गंमती जंमती करताना दिसत आहे. शहनाजचा तो व्हिडिओ केवळ तिचाच नाही तर त्यात शहबाज, अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी यांच्यासोबत दिसते आहे.

शहनाजच्या त्या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा भाऊ दोघेही एका बाथटबमध्ये फनी डान्स करताना दिसत आहेत. त्या दोघांच्या फॅन्सनं त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी स्माईली शेअर करुन त्यांना धन्यवादही दिले आहेत. जॉर्जियाचा हा वेगळा अंदाजही तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. तिनं तो व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, पार्टनर इन क्राईमच्या सोबत मस्ती करताना जाम मजा आली.

व्हिडिओमध्ये जॉर्जियानं ब्ल्यु कलरचे टी शर्ट आणि शॉटर्स परिधान केले आहेत. तर शहबाजनं ब्लॅक रंगाचे एक टीशर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स घातली आहे. या अगोदरही त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. आताच्या व्हिडिओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ते दोघेजण पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये दिसले होते.

जॉर्जिया आणि शहबाज हे एका गाण्यामध्ये दिसून येणार आहेत. त्याचे शुटिंग सुरु आहे. त्या व्हिडिओच्या शुटिंगच्या दरम्यान हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावेळी त्या दोघांनी त्यांचा पोलिसाच्या वेषातील व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा त्यांनी आपल्या आगामी गाण्याविषयी सांगितले होते.

loading image
go to top