ईदच्या पार्टीत शहनाझ-सलमानची जवळीक कॅमेऱ्यात कैद; kiss करतानाचा Video Viral Shehnaaz Gill | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shehnaaz Gill kisses Salman Khan at Eid party

ईदच्या पार्टीत शहनाझ-सलमानची जवळीक कॅमेऱ्यात कैद; kiss करतानाचा Video Viral

सलमान खानची(Salman Khan) बहिण अर्पिता खान आणि जीजू आयुष शर्मा यांच्या घरी ईदच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत जॅकलिन फर्नांडिस,कियारा अडवाणी,सिद्धार्थ मल्होत्रा,करण जोहर(Karan Johar),दीपिका पदूकोण,रणवीर सिंग अशा अनेक बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या बड्या स्टारर्समध्ये पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शहनाझ गिल सगळ्यात जास्त लाइमलाइटमध्ये आली. सुरुवातीला तिच्या एन्ट्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला,ज्यामधील तिच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झालेले दिसले. पार्टीनंतर सलमान स्वतः तिला बाहेर सोडायला गेला,जिथे दोघांमधलं क्यूट बॉन्डिंग दिसून आलं. शहनाज कधी सलमानला किस करताना दिसली तर कधी प्रेमानं सलामनच्या गालांवरनं हात फिरवताना दिसली. एवढचं नाही तर सलमानचा हात पकडून त्याला ओढत-ओढत गाडीजवळ नेतानाही शहनाझ दिसली. आणि तिथे शांत बसेल ती शहनाझ कसली,ती पापाराझींना बोलली की सलमान मला गाडीपर्यंत सोडायला आला आहे. सलमान-शहनाझचे ईद पार्टीतले फोटो,व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

ईदच्या पार्टीनंतर सलमान खान आणि शहनाझ गिल बाहेर आले तेव्हा त्यांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोज देखील दिले,जिथे त्यांच्यात सुंदर बॉन्डिंग दिसून आलं. जसं 'बिग बॉस १३' च्या वेळेस सलमान शहनाझशी प्रेमानं,आपुलकीनं वागायचा तसाच तो इथेही तिच्याशी वागताना दिसला. शहनाझनं देखील सलमानची प्रेमानं गळाभेट घेतली. त्याच्या खांद्याला किस केलं. या संपूर्ण वेळेत शहनाझ आणि सलमान एकमेकांशी खूप प्रेमानं बोलताना दिसले.

शहनाझ गिल मनमोकळं वागणं तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. तिचा तोच अंदाज सलमानच्या ईदच्या पार्टीत देखील दिसला. जेव्हा शहनाझ जाण्यासाठी निघाली तेव्हा सलमाननं मागून ओरडून म्हटलं,''नीट जा,पंजाबची कतरिना कैफ''. तेव्हा शहनाझनं देखील त्याचा हात पकडला अन् म्हणाली,''मला सोडायला चला''. हे पाहून तिथे उभे असलेले सारेच हसायला लागले. सलमान तिला कारपर्यंत सोडायला गेला,जिथे शहनाझनं सलमानला प्रेमानं मिठी मारली. आणि त्याच्या गालावरनं हातही फिरवला. आता हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सलमान-शहनाझची केमिस्ट्री चाहत्यांना भलतीच आवडलेली दिसतेय. कोणी त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवत लिहिलं आहे,''खूपच क्युट'', तर कोणी लिहीलं आहे,''शहनाझसारखं दुसरं कोणीच नाही''.

हेही वाचा: पायलट फेडरेशनने अजय देवगणला फटकारलं; म्हणाले,'Runway 34 सिनेमात सगळंच ...'

बातम्या येत आहेत की,शहनाझ गिल सलमान खानच्या 'कभी ईद,कभी दिवाली' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करीत आहे. तिच्या भूमिकेचा ग्राफही चांगला असल्याचं बोललं जात आहे. आयुष शर्मासोबत ती दिसणार आहे. अद्याप अधिकृतरित्या याची घोषणा सिनेमाच्या टीमतर्फे करण्यात आलेली नाही.शहनाझ गिलला 'बिग बॉस १३' च्या माध्यमातून जास्त प्रसिद्धी मिळाली. तिनं आपल्या विनोदी बोलण्यानं,वागण्यातू न सलमानला खूप हसवलं होतं. खास मित्र सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमंतर बिग बॉस १५ मध्ये त्याला अनोख्या पद्धतीत श्रद्धांजली वाहिली गेली तेव्हा देखील शहनाझला निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी भावूक झालेल्या शहनाझला सावरताना सलमाननं दिलेली साथ त्यांच्यात निर्माण झालेल्या त्या खास बॉन्डिंगची साक्ष देऊन गेला.

Web Title: Shehnaaz Gill Kisses Salman Khan At Eid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top