माझा पुर्नजन्मावर विश्वास आहे,सिद्धार्थ परत आलाय;का म्हणाली असं शहनाझ? shehnaaz Gill | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Shukla, Shehnaaz Gill

माझा पुर्नजन्मावर विश्वास आहे,सिद्धार्थ परत आलाय;का म्हणाली असं शहनाझ?

'बिग बॉस सिझन १३' विशेष गाजला तो स्पर्धकांमधील टशन,टास्कमधली हाणामारी याहीपेक्षा शहनाझ गिल(Shehnaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्ला(Sidharth Shukla) यांच्यातील मैत्रीमुळे किंवा म्हणता येईल मैत्रिच्या पुढे गेलेल्या त्यांच्या नात्यामुळे. सिद्धार्थ शुक्ला 'बिग बॉस १३' चा विनर ठरला, पण शो संपल्यानंतरही त्यानं शेहनाझ सोबतच घरातलं नातं पुढेही टिकवलं. उलट त्या दोघांमधलं नातं अधिक घट्ट झालेलं पहायला मिळालं. त्या दोघांनी उघडपणे कबूल केलं नसेल पण त्यांच्यात प्रेम आहे हे त्यांनी न सांगताच कळायचं. सिद्धार्थच्या अकाली मृत्यूनंतर कोसळलेली शेहनाझ सगळयांनी पाहिलीय. त्याच्या मृत्यूनंतर अनेक दिवस तिनं स्वतःला जगापासून तोडलं होतं. पण म्हणतात नं शो मस्ट गो ऑन...तसंच काहीसं तिच्या आयुष्यात झालं अनं ती पुन्हा नव्यानं आयुष्यात उभी राहिली. लोकांमध्ये मिसळू लागली. आनंदी दिसू लागली.

तिच्या आनंदी राहण्यावर अनेकांनी प्रश्न केले,इतक्या लवकर सिद्धार्थला विसरलीस का? पण लोकं हे विसरतात,जाणारा गेला पण मागे राहिलेल्याला जगावं लागणार,ते जगणं सोडून कसं चालेल. असो,आता शहनाझनं दोन दिवसांपूर्वी बीकेशिवानी ज्या ब्रम्हविद्या प्रसारक आहेत त्यांच्यासोबत एका चॅट शो मध्ये भाग घेतला होता. सध्या शेहनाझ ब्रम्हविद्येचे धडे घेत आहे. खरंतर सिद्धार्थ असतानाच तिनं त्याला शिवानीजींशी भेट करून दे म्हटलं होतं. पण ते राहून गेलं. हे तिनं त्या शो मध्ये सांगितलं. तसंच अनेक गोष्टींवर खुलासे तेव्हा करण्यात आले. ज्यामध्ये माणसाच्या पुनर्जन्मावरही भाष्य करण्यात आलं.

हेही वाचा: ट्वीटरविरोधात कपिल शर्मा जाणार कोर्टात;हे तर उलट घडणार...

ब्रम्हविद्या शिकण्यास प्रारंभ केल्यापासून मला खूप बरं वाटतंय. मी खूप सकारात्मक विचार करू लागलेय. मनातल्या वाईट विचारांना दूर पळवणं मला जमू लागलंय असं शेहनाझ म्हणाली. तेव्हाच सिद्धार्थचाही पुनर्जन्म झाला असेल,यावरही चर्चा झाली. सिद्धार्थ शुक्ला गेला तेव्हा त्याची आई इतकी धीट कशी वाटली या चर्चेला उधाण आलं होतं. पण नंतर समोर आलं की त्याची आई ही ब्रम्हविद्या उपासक आहे. आता शेहनाझही सिद्धार्थच्या दुःखातनं सावरतेय यामागचं कारणही ब्रम्हविद्या आहे हे समोर आलंय ते तिनं ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातनं. शहनाझ आता प्रत्येक काम स्विकारतानाही आपण ब्रम्हविद्येत शिकलेल्या विद्येचा,विचारांचा वापर करू असं या चॅट शो मध्ये म्हणाली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top