Shehzada : बॉक्स ऑफिसवर 'शेहजादा'ची जादू! कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kartik aaryan and kriti sanon

Shehzada : बॉक्स ऑफिसवर 'शेहजादा'ची जादू! कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Shehzada Box Office Collection: कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन स्टारर रोहित धवन दिग्दर्शित 'शहजादा' चित्रपट 17 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असताना हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हे सर्व असूनही, कार्तिक आर्यनच्या चित्रपटाला रिलीजच्या पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला ते जाणून घेऊया.

कार्तिक आर्यनने गेल्या वर्षी 'भूल भुलैया 2'द्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला. दुसरीकडे, स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत आपला वेगळा ठसा उमटवणारा कार्तिक आर्यन त्याच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनाही 'शहजादा'कडून खूप आशा आहेत.

या सगळ्यात चित्रपटाच्या ओपनिंग डेचे आकडे समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7 कोटींची कमाई केली आहे. त्याचबरोबर हा चित्रपट 85 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. मात्र, कार्तिकच्या 'शेहजादा'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन अपेक्षेप्रमाणे झाले नाही.

कार्तिक आर्यनचा 'शेहजादा' हा तेलगू चित्रपट 'अला वैकुंठापुरमुल'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांनी मूळ चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. 'शहजादा'मध्ये कार्तिक आर्यनशिवाय क्रिती आणि परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

कार्तिकच्या 'शेहजादा'ला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर सर्वांच्या नजरा वीकेंडवर खिळल्या आहेत. शनिवार आणि रविवारी हा चित्रपट चांगला कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे.