Shetkarich Navara Hava: 'जगणं हे न्यारं झालं जी', शेतकरीच नवरा हवा मधील अभिनेता चढला बोहल्यावर

शेतकरीच नवरा हवा ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने लग्न केलंय
shetkarich navara hava fame actor jitendra pol wedding with girlfriend
shetkarich navara hava fame actor jitendra pol wedding with girlfriend SAKAL
Updated on

Jitendra Pol Wedding News: शेतकरीच नवरा हवा ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने लग्न केलंय. हा अभिनेता म्हणजे जितेंद्र पोळ. जितेंद्र पोळ हा मराठी मनोरंजन विश्वातला लोकप्रिय अभिनेता. जितेंद्र पोळने अस्मिता पांडे सोबत लग्न केलंय. जितेंद्र आणि अस्मिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

(shetkarich navara hava fame actor jitendra pol wedding with girlfriend )

जितेंद्र पोळच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांनी अभिनंदन केलंय. जितेंद्रने गर्लफ्रेंड अस्मिता पांडे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. थाटामाटात हा सोहळा पार पडला आहे.

जितेंद्र पोळ हा गेल्या काही वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. जितेंद्र शरीराने तंदुरुस्त असल्याने कॉलेजमध्ये एका नाटकातील पहिलवानाच्या भूमिकेसाठी त्याला विचारणा करण्यात आली.

त्यानंतर त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. 'जीव माझा गुंतला' या मालिकेत त्याने रॉकीची भूमिका साकारली होती. 'संत गजानन शेगावीचे' या मालिकेत त्याने दामोदरपंत ही एक महत्वाची भूमिका बजावली होती. त्याची पत्नीदेखील अभिनेत्रीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com