अजून तर लग्न व्हायचंय, त्यापूर्वीच शिबानीची पोस्ट|Shibani-Farhan AKhtar marriage news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजून तर लग्न व्हायचंय, त्यापूर्वीच शिबानीची पोस्ट

अजून तर लग्न व्हायचंय, त्यापूर्वीच शिबानीची पोस्ट

शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आणि फरहान अख्तर (Farhan Akhtar) पुढच्या वीकेंडला लग्न करण्याच्या तयारीत आहेत. दोघेही सोशल मिडीयावर चांगलेच उत्साही दिसत आहेत. शिबानीने नुकताच एक फोटो शेअर केला ज्यात ती शक्य तितकी विश्रांती घेत, तिच्या प्रवासातील एका पिटस्टॉपवर एअरपोर्ट लाउंजमध्ये बसली आहे.

फोटोमध्ये ती आरामात झोपताना दिसत आहे. फोटो शेअर करताना शिबानीने कॅप्शन दिले की, "थकलीये, पण उत्साही आहे!" शिबानीचा जवळचा मित्र गौरव कपूर (Gaurav Kapoor) याने देखील फोटोवर कमेंट केली की, ''मी ही पुढच्या विकेंडसाठी उत्सुक आहे.'' दोघेही 21 फेब्रुवारीला मुंबईत त्यांच्या लग्नाची नोंदणी करणार आहेत. जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या खंडाळा फार्महाऊसवर हे सेलिब्रेशन होणार आहे.

हेही वाचा: करणचा दोनदा घटस्फोट, बिपाशाने कसं पटवलं घरच्यांना ?

फरहान आणि शिबानी मार्च महिन्यात मुंबईत भव्य लग्न करण्याचा विचार करत आहेत. पण, कोरोनाचा वाढता धोका आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा (Coronavirus) फटका बसत असल्यानं त्यांनी आपलं वैवाहिक जीवन लवकर सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. फरहान आणि शिबानीनं आता जवळचे नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

Web Title: Shibani Dandekar Farhan Akhtar Marriage Next Weekend

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top