Bigg Boss 17: या अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटरची होणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री; कोण आहे ती?

एका सुप्रसिद्ध अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटरची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार आहे
shilpa sethi adult content creator enter in salman khan bigg boss 17
shilpa sethi adult content creator enter in salman khan bigg boss 17SAKAL

सलमान खानच्या बिग बॉस 17 ची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. मागचा सीझन सुपरहिट झाल्याने बिग बॉस 17 साठी सुद्धा जोरदार तयारी सुरु झालीय. बिग बॉस 17 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची जोरदार चर्चा आहे.

अशातच बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणाऱ्या नवीन स्पर्धकाविषयी खुलासा झालाय. ही स्पर्धक दुसरी तिसरी कोणी नसून ती एक अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटर आहे. तिचं नाव शिल्पा सेठी. कोण आहे ती? जाणून घेऊ.

(shilpa sethi adult content creator enter in salman khan bigg boss 17)

shilpa sethi adult content creator enter in salman khan bigg boss 17
Nushrratt Bharuccha : इस्राइलमध्ये युद्धाच्या भडक्यात अडकली नुसरत भरुचा; संपर्क होत नसल्याची टीमची माहिती

अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 17 मध्ये प्रवेश करू शकते अशी शक्यता निर्माण झालीय. मीडिया रिपोर्ट्सवर नुसार, भारतीय वंशाच्या अमेरिकन अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठीच्या बिग बॉस 17 मध्ये प्रवेश झाल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. सनी लिओन आणि पामेला अँडरसननंतर, शिल्पा सेठी ही एक सशक्त अ‍ॅडल्ट कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाते. शिल्पा सेठी तिच्या बोल्ड कंटेंट आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. तिचे इन्स्टाग्रामवर ९.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.

कंटेंट क्रिएटर शिल्पा सेठीला लोक सोशल मीडियावर मिस सेठी म्हणून ओळखतात. ती अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

शिल्पा सेठी अशा कंटेंट निर्मात्यांपैकी एक आहे ज्यांचा प्रवास टिक-टॉकच्या जगापासून सुरू झाला. नंतर अभिनेत्रीला इन्स्टाग्रामवर सुद्धा प्रचंड फॅन फॉलोइंग मिळाले.

shilpa sethi adult content creator enter in salman khan bigg boss 17
Pushkar Jog: "कायदा जरी आपल्या विरुद्ध गेला तरीही", पुष्करने लेकीसाठी केलेली पोस्ट चर्चेत, काय घडलंय नेमकं?

बिग बॉस 17 चा ग्रँड प्रीमियर 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि शनिवार-रविवार रात्री 9 वाजता कलर्स टीव्ही वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तर OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर शो 24 तास लाइव्ह पाहू शकता.

तर घरातील स्पर्धकांबद्दल बोलायचं झालं तर अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, अरिजित तनेजा, ऐश्वर्या शर्मा आणि अरमान मलिकसोबतच बऱ्याच नावांची चर्चा आहे. आता हा शो प्रेक्षकांच्या किती पसंती पडेल हे पहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com