शिल्पा शेट्टीला अपघात, शूटिंगच्या दरम्यानं Action Scene करणं पडलं महागात

रोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' या सीरिजमध्ये ती विवेक ओबेरॉय आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम करत आहे.
Shilpa Shetty Accident While shooting for Rohit Shetty Movie, Leg Injury plaster Photo Viral
Shilpa Shetty Accident While shooting for Rohit Shetty Movie, Leg Injury plaster Photo Viral Instagram

Shilpa Shetty Accident: काल-परवापर्यंत शिल्पा शेट्टी रोहित शेट्टीच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये चांगलीच व्यस्त होती. मात्र आता बातमी आहे की अॅक्शन सीन करताना अभिनेत्रीच्या पायाला जबरदस्त मार बसला आहे. शिल्पा शेट्टीचे चाहते मात्र यामुळे चांगलेच टेन्शनमध्ये आले आहेत. अभिनेत्रीच्या पायातलं हाड मोडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तिच्या पायाला मलमपट्टी केल्याचा फोटोही समोर आला आहे. शिल्पा शेट्टीला सहा आठवड्यासाठी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.(Shilpa Shetty Accident While shooting for Rohit Shetty Movie, Leg Injury plaster Photo Viral)

Shilpa Shetty Accident While shooting for Rohit Shetty Movie, Leg Injury plaster Photo Viral
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाश मराठीत, अभिनय बेर्डेसोबत दिसणार रोमान्स करताना

शिल्पाला अशा अवस्थेत पाहून तिचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रानं तिच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की,'शिल्पा तू लवकर बरी हो'. सिंगर बादशहा ने लिहिलं आहे,'अरे यार'. तर तिची छोटी बहिण शमिता शेट्टीनं लिहिलं आहे, 'माझी मुनकी खूप स्ट्रॉंग आहे. ती लवकरच बरी होईल'. तसंच,शमितानं रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. चाहत्यांनी देखील शिल्पाच्या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवताना ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

Shilpa Shetty Accident While shooting for Rohit Shetty Movie, Leg Injury plaster Photo Viral
'तर तुला बायकांनी मारलं असतं...', रत्ना पाठक यांच्यावर भडकले मुकेश खन्ना

शिल्पा शेट्टीनं स्वतः आपल्या अपघाताची माहिती इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत दिली. शिल्पा शेट्टी फोटोत व्हिलचेअरवर बसलेली दिसत आहे. पायावर फॅक्चर झाल्यावर बांधतात अगदी तशीच मलमपट्टी केलेली दिसत आहे. पण अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतूक करावं लागणार हे नक्की. एवढं लागलं असतानाही शिल्पाच्या चेहऱ्यावर हसू मात्र छान टिकलेलं आहे. तिनं व्हिलचेअरवर बसूनही कॅमेऱ्याला अगदी स्माईली पोझ दिली आहे. शिल्पानं हा फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिलं आहे,''ते म्हणतात नं,रोल,कॅमेरा,अॅक्शन आणि बघा,पाय तुटला. सहा आठवड्यांसाठी आता मी अॅक्शन नाही करु शकणार,पण मी अधिक सक्षम बनून परत येईन कामावर. तुमचे आशीर्वाद असू देत माझ्यावर,आणि स्मरणात ठेवा मी परत येईपर्यंत,शिल्पा शेट्टी कुंद्रा''.

शिल्पाच्या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर शिल्पा शेट्टी, रोहित शेट्टीच्या फिमेल कॉप फिल्म 'इंडियन पुलिस फोर्स' मध्ये विवेक ओबेरॉय आणि सिद्धार्थ मल्होत्रा सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिंघम,सूर्यवंशी,सिंबा ची छाप या सिरीजवर पडलेली दिसेल. ही फिक्शनल सिरीज असणार आहे,जी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होईल. शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच एका महिला पोलिस अधिकऱ्याच्या भूमिकेत दिसेल. शिल्पा आधी अनेक अभिनेत्रींनी महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका रंगवलेली आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com