सुत्रांनी माहिती दिली तर त्यात चूक काय? न्यायालयानं शिल्पाला झापलं

बॉलीवूड (bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिनं काल 29 मीडिया हाऊसच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
shilpa
shilpaTeam esakal

मुंबई - बॉलीवूड (bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) हिनं काल 29 मीडिया हाऊसच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यात तिनं आपल्या विरोधात चूकीचं रिपोर्टींग करणं आणि आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणं असं म्हटलं होतं. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला झापलं आहे. न्यायालयानं शिल्पाला सांगितलं आहे की, जर सुत्रांच्या हवाल्यानं मीडियानं माहिती दिली असेल त्यात चूक काय? त्यामुळे शिल्पानं मीडियाच्या विरोधात केलेल्या याचिकेवरुन चर्चा सुरु झालीय. (shilpa shetty defamation case bombay hc says no part of this shall be constructed as a gag on media yst88)

उच्च न्यायालयानं (bombay high court) असं सांगितलं आहे की, तुमच्या पतीविरोधातील हा खटला आहे. आणि त्यात न्यायालय कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. आता तुमचा क्लायंट हा कोणीही असू शकेल. मात्र मानहानीच्या संदर्भात आपल्याकडे एकच कायदा आहे. हेही लक्षात घ्यायला हवा. आपल्याला सांगायला हवं की, शिल्पानं यावेळी मुंबई उच्च न्यायालयाला असं सांगितलं, राज कुंद्रा यांच्या या पॉर्नोग्राफी प्रकरणात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कोर्ट म्हणाले, आपलं म्हणणं असं आहे का, की कोर्टानं मीडियानं जे वार्तांकन केलं आहे त्याच्या प्रत्येक बातमीची शहानिशा करावी. आणि त्यांनी ज्या सुत्रांच्या आधारे वार्तांकन केलं आहे त्या सुत्रांची तपासणी करावी. हे कसे शक्य आहे ?

माध्यमं जर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असा उल्लेख करुन बातमी दिली असेल तर त्यात अपमानजनक काय आहे, आपण म्हणता त्यानुसार जर कारवाई करायची म्हटल्यास माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याशिवाय राहणार नाही. त्याचे गंभीर परिणाम त्या व्यवस्थेवर होतील. जर कोणी शिल्पा शेट्टीच्या विरोधात काही बोलत असेल तर त्यात मोठी गोष्ट काय आहे, त्यात मोठी बाब काय आहे, असा प्रश्न न्यायालयानं यावेळी उपस्थित केला.

shilpa
'राजकडून शिल्पाच्या चेहऱ्याचा वापर' भाजप नेते राम कदम यांचा आरोप
shilpa
आठ वर्षांनी अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणावर होणार सुनावणी

जेव्हा तुम्ही सार्वजनिक आयुष्य जगत असता तेव्हा त्याचे काही परिणाम असतात. आणि ते आपण लक्षात घ्यायला हवे. अनेकांनी तुमच्याबदद्ल कुतूहल आहे. त्यावर अनेकांनी त्याविषयी केलेलं लिखाण हे अपमानास्पद कसे काय असू शकते, माध्यमांचे अधिकार आणि स्वातंत्र्य याविषयी आपण संतुलन साधण्याची गरज असल्याचं निरीक्षणही यावेळी न्यायालयानं नोंदवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com