
राज कुंद्रा अटकप्रकरणी शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया
अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी व्यावसायिक राज कुंद्राच्या Raj Kundra अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टीने Shilpa Shetty पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने सोशल मीडियावर 'माझं स्टेटमेंट' असा उल्लेख करत पोस्ट लिहिली आहे. 'मुंबई पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गांचा अवलंब करू. पण मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलांखातर तरी आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी कोणाचाही विश्वासघात केला नाही,' असं शिल्पाने त्यात स्पष्ट केलंय. (shilpa shetty first official statement on husband raj kundra arrest case slv92)
शिल्पा शेट्टीचं स्टेटमेंट
'होय, गेले काही दिवस प्रत्येक पातळीवर आव्हानात्मक होते. अनेक आरोप होत आहेत आणि अफवा पसरत आहेत. मीडिया आणि माझं हित न चिंतणारे माझ्याविषयी बरंवाईट बोलत आहेत. फक्त माझ्याविरोधातच नाही तर माझ्या कुटुंबीयांविरोधातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ट्रोलिंग केलं जातंय. मी या सर्व प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, ही माझी भूमिका आहे. यापुढेही मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे माझ्याबद्दल चुकीची विधानं करू नका. सेलिब्रिटी म्हणून मी पुन्हा हे तत्त्वज्ञान सांगते की, कधीही तक्रार करू नका, कधीही स्पष्टीकरण देऊ नका. मी इतकंच म्हणू शकेन की, मला मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गांचा अवलंब करू', अशी पोस्ट शिल्पाने लिहिली.
हेही वाचा: राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीला कोट्यवधींचं नुकसान
'तोपर्यंत एक आई म्हणून मी नम्रपणे विनंती करते, की माझ्या मुलांखातर तरी आमच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करू नका. कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता त्याविषयी बोलू नका. मी कायद्याचं पालन करणारी भारतीय नागरिक आहे आणि गेल्या २९ वर्षांपासून मेहनतीने इंडस्ट्रीत काम करतेय. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मी कोणाचाच विश्वासघात केलेला नाही. त्यामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. आमच्या विषयावर मीडिया ट्रायल होणं योग्य नाही. न्यायव्यवस्थेला त्यांचं काम करू द्या. सत्यमेव जयते', असं तिने पुढे लिहिलं आहे.
राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थार्पला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. फेब्रुवारी महिन्यात मढ परिसरातल्या एका बंगल्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांना कळाली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान राज कुंद्राचं नाव समोर आलं. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर दहा आरोपी हे जामिनावर मुक्त आहेत.
Web Title: Shilpa Shetty First Official Statement On Husband Raj Kundra Arrest Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..