भूत म्हणायचं, एलियन की आणखी काही..  राज कुंद्राचा अवतार पाहून.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra face covered jacket

भूत म्हणायचं, एलियन की आणखी काही..  राज कुंद्राचा अवतार पाहून..

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)चा नवरा बिझनेसमॅन राज कुंद्रा(Raj Kundra) अश्लीम (porn film making) फिल्म निर्मिती प्रकरणामुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज कुंद्राला मुंबई (crime branch) क्राइम ब्रांच टीमनं अश्लिल फिल्म बनवणं आणि त्याचं वितरण करणं या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर दीड-दोन महिने तुरुंगात कढल्यानंतर त्याची जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. सध्या राज कुंद्रा बाजूने गेला तरी त्याला ओळखता येणार नाही. कारण त्याचा अवतार पार बदलून गेला आहे. माध्यमांपासून तोंड लपवण्यासाठी तो नाना तऱ्हेचे उपाय करत आहे.

हेही वाचा: इतिहासजमा झालेली पैठणी आज जगात गाजतेय.. 'होम मिनिस्टर'आलं आणि...

राज कुंद्रा मास्क, जॅकेट याचा वापर करून स्वतःचे तोंड लपवत आहे. पण त्याचा अवतार पाहून लोकांना मात्र हसू आवरत नाहीय. यावेळी राज कुंद्रा विमानतळावरून घरी परतताना दिसला. पण त्याच्या या लुकचीही सवय झाल्याने काहींनी त्याला ओळखलेच. यंदा त्याने पांढरे जॅकेट घातले होते. ब्लॅक जीन्स आणि त्यावर पांढरे कुणीही परिधान करेल पण राज याचे जॅकेट पाहून अनेकांचे डोळे फिरले. कमरेपासून ते डोक्यापर्यंत पूर्णतः चेहरा झाकला जाईल असे हे जॅकेट होते. ते जॅकेट उघडता यावे यासाठी मधून त्याला एक चेन दिलेली आहे. तर डोळ्यांनी बाहेरचे पाहता यावे यासाठी डोळ्यांच्या भागात काळ्या काचा आणि श्वास घेता यावा यासाठी नाकाजवळ काळी जाळी असे हे जॅकेट होते.

जेव्हा जेव्हा राज कुंद्रा अशा लुक मध्ये दिसला आहे तेव्हा ते तेव्हा लोकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. त्याचे हे नवे जॅकेट आणि नवा लूकही कालपासून व्हायरल होत आहे. राजने अशा पद्धतीचे जॅकेट बनवून घेतले आहेत. यामध्ये काळ्या , निळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगाचे जॅकेट आहेत. मागेही तो अशाच एका अवतारात दिसला होता, त्यावेळी त्याला हॉलिवूड मधील 'डेडपूल' ची उपमा दिली गेली. डेडपूल हा हॉलीवूडमधील चित्रपट आहेत ज्याध्ये नायकाचा अवतार राज कुंद्राच्या लूकशी जुळणारा आहे. 'कदाचित तोंड दाखवण्यासारखे दिवस राहिले नाही' अशी एका चाहत्याने यावर कमेंट केली आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

Web Title: Shilpa Shettys Husband Raj Kundras Quirky Look On

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top