'शिमगा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

shimga marathi film teaser release
shimga marathi film teaser release

कोकणातील 'शिमगा' हा सण प्रत्येक कोकणी माणसासोबतच मुंबई, पुण्यातील किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आणि चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. होळी या सणाला कोकणात 'शिमगा' म्हणतात. वर्षभर महाराष्ट्रातील सर्व चाकरमानी, मानकरी लोक या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या विषयावर लवकरच एक चित्रपट येतोय 'शिमगा'.

नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला आहे. राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान हे जोशात ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर पालखी नाचवताना टिझर मध्ये दिसत आहे. 

श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित 'शिमगा' हा चित्रपट 15 मार्च ला प्रदर्शित होणार आहे. मूळचे कोकणाचे निलेश कृष्णाजी पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान आणि कमलेश सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर पंकज पडघन, गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते यात असणार आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे. होळीच्या म्हणजेच शिमग्याचा मुहूर्त गाठत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com