Shiv Thakare: 'बिग बॉस 16' फेम शिव ठाकरेला लागली लॉटरी! नव्या गाडीनंतर सुरू केला नवा बिझनेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv thakare

Shiv Thakare: 'बिग बॉस 16' फेम शिव ठाकरेला लागली लॉटरी! नव्या गाडीनंतर सुरू केला नवा बिझनेस

'बिग बॉस 16' फेम शिव ठाकरे शो संपल्यानंतरही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने लाखो रुपयांची कार खरेदी केली होती, त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याच वेळी, आता त्याने आपला नवीन व्यवसाय सुरू केला आहे. होय, शिवने मुंबईत 'ठाकरे टी अँड स्नॅक्स' नावाचे रेस्टॉरंट उघडले आहे.

त्यानी हसलर हॉस्पिटॅलिटीशी कोलॅबरेट केलं आहे. विशेष म्हणजे याच कंपनीसोबत अब्दु रोझिकने मुंबईत स्वतःचे रेस्टॉरंटही उघडले आहे, जे 'बर्गर' सर्व्ह करते.

शिवने नुकतेच या रेस्टॉरंटचे उद्घाटन केले, ज्यात खाण्यापिण्याची सोय केली जाईल. त्याच्या या आउटलेटमध्ये तुम्हाला २५ पेक्षा जास्त प्रकारचे चहा आणि नाश्ता दिला जाईल. ही आनंदाची बातमी त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. विशेष म्हणजे या लोगोमध्ये शिवचा फोटो लावण्यात आला आहे.

शिवने काही दिवसांपूर्वी एक नवीन कार घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून त्याने सांगितले की, सेकंड हँड गाडीनंतर आता त्याने नवीन गाडी घेतले आहे. त्याचवेळी अब्दू रोजिकने 'बिग बॉस 16' या शोमधूनही खूप लोकप्रियता मिळवली.

शोमधून बाहेर आल्यानंतर अनेक म्युझिक व्हिडिओ रिलीज केले. अब्दू रोजिक रमजान महिना सुरू असल्यामुळे सध्या दुबईतील त्याच्या कुटुंबियांसोबत आहे. नुकताच अब्दूने भावासोबतचा एक फोटोही शेअर केला होता.