
Shraddha Arya Video: 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धाचा टॉवेल डान्स व्हायरल! नेटकऱ्यांनी केलं मार्केट जाम
हिंदी टीव्ही मनोरंजन विश्वातील 'कुंडली भाग्य' ही एक लोकप्रिय मालिका आहे. यामालिकेतील प्रिताची भुमिका प्रेक्षकांना खुप आवडते. टीव्हीवर सुसंस्कृत सुनेची भुमिका करणारी श्रद्धा आर्या ही तिच्या खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. श्रद्धा सोशल मिडियावर सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचा चाहता वर्गही चांगला आहे.
नुकतचं श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये ती टॉवेल घालून नाचताना दिसत आहे. श्रद्धाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओला प्रतिक्रिया देत आहेत.
श्रद्धाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ तिने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये श्रद्धा तिच्या रुममध्ये ऑफिसला जाण्यासाठी तयार होताना दिसत आहे. यात तिने टॉवेल डान्स करत ती तयारी करत आहेत. मात्र, तयारीसोबतच ती मस्तीच्याही मूडमध्ये आहे. तयार होण्यापासून ते क्रीम लावण्यापर्यंतची सगळी काम तिने या व्हिडिओत दाखवली आहे.
व्हिडिओच्या वर कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला विचारतो की, रोज सकाळी उशीर कसा होतो? . हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, 'माफ करा मला उशीर झाला, मला यायचं नव्हतं.'
तिचा हा व्हिडिओला 1.4 मिलियनहून अधिक व्ह्यूज आले आहेत. 1 लाख 30 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे तर अनेकांनी तिच्या व्हिडिओला कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलयं तर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.