पुण्याच्या श्रद्धा कक्कड 'मिसेस युनायटेड नेशन्स' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

21 ते 28 जुलै दरम्यान झालेल्या या स्पर्धेत त्यांनी 80 देशातील सौंदर्यवतींना मागे टाकत 'मिसेस युनायटेड नेशन्स' होण्याचा बहुमान मिळवला आहे. या स्पर्धेत श्रद्धा कक्कड यांनी आशिया विभागाचे नेतृत्व केले. 

पुणे : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अमेरिका येथे झालेल्या 'मिसेस युनायटेड नेशन्स' या स्पर्धेत पुण्यातील श्रद्धा कक्कड यांनी 'मिसेस युनायटेड नेशन्स 2018'चे विजेतेपद पटकावले. 21 ते 28 जुलै दरम्यान झालेल्या या स्पर्धेत त्यांनी 80 देशातील सौंदर्यवतींना मागे टाकत 'मिसेस युनायटेड नेशन्स' होण्याचा बहुमान मिळवला आहे. या स्पर्धेत श्रद्धा यांनी आशिया विभागाचे नेतृत्व केले. 

मिसेस युनायटेड नेशन्स'तर्फे ही सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. फॅशन राउंडपासून कुकिंग राउंडपर्यंत अशा विविध राउंडमध्ये बाजी मारत श्रद्धा यांनी हा किताब मिळवला आहे. ही स्पर्धा लिवॉन विल्यम्स यांनी आयोजित केली होती. 'सकाळ'शी बोलताना त्यांनी विजेतेपद जिंकल्याची माहिती दिली. स्पर्धेसाठी त्यांना 'मिसेस इंडिया होम मेकर्स' रितिका रामत्री यांनी मार्गदर्शन केले. 

श्रद्धा यांनी 2000 मध्ये 'मिसेस नाशिक' स्पर्धा जिंकली होती. सिंहगड कॉलेजमध्ये इंटेरियर डिझाईनिंगचे शिक्षण घेत असताना त्यांनी 'मिस पुणे' स्पर्धा जिंकली. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी 'मिसेस इंडिया होम मेकर्स' या स्पर्धेत सहभाग घेऊन उपविजेतेपद पटकावले. आता त्यांनी 'मिसेस युनायटेड नेशन्स' स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. 

जागतिक स्पर्धा जिंकल्याचा आनंद -
याबाबत श्रद्धा म्हणाल्या, "या स्पर्धेत देश-विदेशांतील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विविध राउंडमध्ये मोठ्या मेहनतीने मी सहभाग घेऊन ही स्पर्धा जिंकली. जागतिक स्तरावरील स्पर्धा जिंकल्याचा आनंद आणि अभिमान आहे.'' 

'मिसेस युनायटेड नेशन्स 2018' या स्पर्धेला जाण्यापुर्वी श्रध्दा कक्कड यांनी 'सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्यांच्याशी साधलेला संवाद...
 

 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shraddha Kakkad From Pune Become Misses United Nations