रात्रभर जागून श्रद्धा कपूर करायची हे... 

वृत्तसंस्था
Monday, 19 August 2019

श्रद्धा कपूर ही एक बाॅलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री हाेय. तिचा आगामी काळात साहाे हा चित्रपट लवकरच रिलीज हाेत आहे. या चित्रपटात ती क्राइम ब्रँच ऑफिसर अमृता नायरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तेलगू डबिंगसाठी मी कुणाचीही मदत घेणार नाही, असे श्रद्धाने आधीच सांगितले होते. ज्याप्रकारे प्रभासने हिंदी व्हर्जनमध्ये संवाद डब केले, त्याचप्रकारे ती स्वत:च तेलगूमध्ये संवाद डब करणार होती. श्रद्धासाठी ते इतके सोपे नव्हते, मात्र तिने यासाठी खूप मेहनत घेतली. 

मुंबई : श्रद्धा कपूर ही एक बाॅलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री हाेय. तिचा आगामी काळात साहाे हा चित्रपट लवकरच रिलीज हाेत आहे. या चित्रपटात ती क्राइम ब्रँच ऑफिसर अमृता नायरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर तेलगू डबिंगसाठी मी कुणाचीही मदत घेणार नाही, असे श्रद्धाने आधीच सांगितले होते. ज्याप्रकारे प्रभासने हिंदी व्हर्जनमध्ये संवाद डब केले, त्याचप्रकारे ती स्वत:च तेलगूमध्ये संवाद डब करणार होती. श्रद्धासाठी ते इतके सोपे नव्हते, मात्र तिने यासाठी खूप मेहनत घेतली. 

श्रद्धाने काय केले - विचार करून संवाद बोलली, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला, रात्रभर जागून तेलगू संवाद पाठ केले, तेलगू शिकण्यासाठी श्रद्धाची मदत स्वत: प्रभासने केली,  तेलगूमध्ये संवाद पाठ करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी श्रद्धा दिग्दर्शक सुजितसोबत बसून त्यावर शूटच्या आधी रोज काम करत होती.

मदत मिळाली तर लवकर शिकता येते.. 
श्रद्धा म्हणते 'शूटिंग सुरू होण्याआधी हैदराबादमध्ये पूर्ण टीमसोबत वाचन व्हायचे. त्यामुळे भाषाशैली लवकर समजायला सोपे गेले. खरं तर, दुसरी भाषा शिकणे मुलांचा खेळ नाही, मात्र तेथील टीम आणि डायलेक्ट कोचच्या मदतीमुळे मी माझे संवाद तेलगूमध्ये बोलू शकले आणि समजूदेखील शकले. आता कळले भाषा खूप अवघड असते, मात्र शिकवणारे असले तर लवकर शिकता येते. माझ्यासाठी हे सर्व खूपच आव्हानात्मक हाेते.

किती झाला फायदा -
यामुळे आता श्रद्धा अर्ध्या पानाचे तेलगू संवाद स्वत:च न थांबता न पाहता बोलू शकते. तिला अनेक संवाद पाठ झाले आहेत. त्यामुळे तिला आपले संवाद डब करण्यात अडचण आली नाही.

भाषा शिकणे गरजेचे -
श्रद्धा कपूरव्यतिरिक्त आलिया भटदेखील दक्षिणेकडे वळाली आहे. सध्या मोठ्या अभिनेत्रींनादेखील तेथील निर्माते अॅप्रोच करत आहेत. ही भिंत तुटल्याचे कारण सांगताना श्रद्धा म्हणते..., तेथील चांगल्या स्क्रिप्ट्स आम्हाला मिळत आहेत. शिवाय तेथे चांगल्या दिग्दर्शकँची फौज आहे. कलाकार म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. अनेक भाषा शिकल्या तर याचा फायदा होतोच.

दुसरीकडे 'स्त्री 2' - चित्रपटाची तयारीदेखील सुरू असल्याची चर्चा आहे. याविषयी श्रद्धा म्हणाली, त्याचे लेखक राज आणि डीकेने दुसऱ्या भागाविषयी लिहिणे सुरू केले आहे. मात्र अजून मला त्याविषयी अप्रोच केले नाही. मात्र ते माझ्याकडे आले तर मी नक्कीच त्यात काम करणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shraddha Kapoor used to stay awake for all night to learn the Telugu dialogue, Prabhas also helped her