श्रद्धाचा सल्ला 

भक्ती परब
शुक्रवार, 9 जून 2017

अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या केसांची खूपच काळजी घेते. विविध भूमिका साकारताना केसांना वेगवेगळी स्टाईल देण्यात येते. त्यामुळे केस कोरडे होतात. म्हणूनच फळांचा वापर करून आपल्या केसांचे आरोग्य सुधारण्यावर श्रद्धा भर देते.

हाच सल्ला तिने महिलावर्गाला दिला आहे. फ्रूट पॅक लावून केस निरोगी ठेवता येतात, असे श्रद्धा सांगते. फळांमुळे कोरडे आणि निस्तेज झालेल्या केसांना नैसर्गिक चकाकी येते. फळांमुळे केसांचे सौंदर्य वाढते. फ्रूट पॅकसोबत फळांपासून बनवलेले तेल किंवा अरोमाचा वापर असलेले तेल मार्केटमध्ये कुठल्या ब्रॅंडने आणले तर ते सर्वांत पहिल्यांदा मीच विकत घेईन, असेही श्रद्धा म्हणाली.

हेअर एक्‍सपर्ट अपर्णा सन्थानाम यांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धाने फळांची ट्रीटमेंट कशी करायची? याविषयी विस्तृत सांगितले. ती म्हणाली, "कच्चे सफरचंद केसांतील कोंडा कमी करते. ऑलिव्ह ऑईलमिश्रित गरम तेलाचा मसाज केल्यामुळे केस मऊसूत आणि आकर्षक दिसतात. त्याचबरोबर लिंबू सरबत प्यायल्याने केस मजबूत होतात.' श्रद्धाने नुकतीच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या चरित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केलीय.

भूषणकुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहेत. केसांचे सौंदर्य टिकण्यासाठी खास करून फ्रूट पॅक वापरण्याचा सल्ला श्रद्धाने दिल्यामुळे तिचा चाहतावर्ग एकदातरी तो आजमावून पाहील हे नक्की... 
 
Web Title: shraddha's Advice