Happy Birthday Shreya : पहिल्याच सिनेमासाठी श्रेया ठरली बेस्ट प्लेबॅक सिंगर

टीम ई-सकाळ
गुरुवार, 12 मार्च 2020

संजय लिला भन्साळी यांनी 2002 साली "देवदास' या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. "बैरी पिया', "सिलसिला ये चाहत का', "छलक छलक', "मोरे पिया', "डोला रे डोला' ही पाच तिने या चित्रपटात गायली. आणि ही सगळीच गाणी गाजली.

Bollywood News गायिका श्रेया घोषालच्या मधुर आवाजाचे बरेच चाहते आहेत. श्रेयाने आजवर बॉलिवूडला अनेक गाजलेली गाणी दिली आहेत. आज श्रेया आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीताचे प्रशिक्षण घेतले असून लहानपणापासूनच तिला गायिका बनण्याचे स्वप्न होते. वयाच्या सोळाव्या वर्षी "सा रे ग म प' या सिगिंग रिऍलिटी शोमध्ये ती आली. या शोमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या नजरेत आली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या शोनंतर संजय लिला भन्साळी यांनी 2002 साली "देवदास' या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. "बैरी पिया', "सिलसिला ये चाहत का', "छलक छलक', "मोरे पिया', "डोला रे डोला' ही पाच तिने या चित्रपटात गायली. आणि ही सगळीच गाणी गाजली. यानंतर "डोला रे डोला' या गाण्यासाठी तिला बेस्ट प्लेबॅक सिंगरसाठी फिल्मफेअर पुरस्कार, नॅशनल फिल्म पुरस्कार आणि आरडी बर्मन न्यू म्युझिक टॅलेंट फिल्मफेअर पुरस्कार असे तीन पुरस्कार मिळाले. चित्रपटसृष्टीत तिला आता अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात तिने अनेक गाणी गायली आहेत आणि ती तितकीच गाजली. श्रेयाच्या वाढदिवसानिमित्त तिची आजवर गायलेल्या गाण्यांवर नजर टाकूया. 

1. "शोर इन द सिटी' चित्रपटातील "सायबो' हे गाणं बरंच गाजलं होतं. श्रेयाने गायलेलं हे गाणं आजही प्रेक्षक गुनगुनताना दिसून येतात. 

2. 2003 साली प्रदर्शित झालेल्या "जिस्म' चित्रपटातील "जादू है नशा है' या गाण्याला श्रेयाने आवाज दिला होता. त्यावेळच हे सर्वात गाजलेलं गाणं ठरलं होतं. 

3. "जब तक है जान' चित्रपटातील "सांस मे तेरी' हे गाणं श्रेयाने गायलं. श्रेयाचा मधुर आवाज आणि शाहरूख खान-कतरिना कैफची केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मन जिंकली होती. 

4. "पल पल हर पल' हे "मुन्ना भाई एम.बी.बी.एस' चित्रपटातील गाणं चांगलचं हिट झालं. 

5. "सुना सुना (बेपनाह प्यार है आजा)' हे "क्रिष्णा कॉटेज' चित्रपटातील गाणं फारच गाजलं. 

6. अक्षय कुमार आणि कतरिना यांच्यावर चित्रीत केलेलं "सिंग इज किंग' चित्रपटातील "तेरी ओर' हे गाणं प्रेक्षक आजही तितक्यायच आवडीने ऐकतात. 

7. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा सुपरहिट चित्रपट "आशिकी 2' चित्रपटातील गाण्यांना श्रेयाने आवाज दिला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी हिट ठरली होती. मात्र "सून रहा है ना तू' या गाण्याने आवाजाने प्रेक्षकांची विशेष मन जिंकली होती. 

8. "वॉंन्टेड' चित्रपटातील "दिल लेके दर्द दे दिल' हे गाणं ही फार गाजलं. 

9. "बहारा' हे "आय हेट लव्ह स्टोरी' चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली. 

10. "बॉडीगार्ड' चित्रपटातील "तेरी मेरी' या गाण्यासाठी श्रेयाला बेस्ट प्ले बॅकर सिंगर म्हणून आयफा पुरस्कार मिळाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shreya Ghoshal top ten bollywood songs information Marathi