श्रेयस तळपदेने केली मोठी घोषणा; 'आपडी-थापडी' चित्रपटाचे पोस्टर आऊट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shreyas talpade shared poster about his new movie apadi thaapdi released date cast

श्रेयस तळपदेने केली मोठी घोषणा; 'आपडी-थापडी' चित्रपटाचे पोस्टर आऊट..

Shreyas talpde : नाटक, मालिका, चित्रपट यांसह केवळ मराठीच नाही तर हिंदीतही आपल्या अभिनयाची मोहर उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे गेली काही दिवस बराच चर्चेत आहे. 'पुष्पा' या दाक्षिणात्य सिनेमासाठी त्याने केलेलं डबिंग असो किंवा 'झी मराठी'वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका. श्रेयसच्या प्रत्येक कामाचे विशेष कौतुक झाले आहे. नुकतीच त्याने एका चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मिडियावरुन त्याने या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. (shreyas talpade shared poster about his new movie apadi thaapdi released date cast)

या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच समोर आले असून 'आपडी थापडी' असे चित्रपटाचे नाव आहे. श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'आपडी थापडी' हा सिनेमा 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आनंद करीर यांनी केली असून केसी पांडे यांनी निर्मिती केली आहे.

श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेसह 'आपडी थापडी' या सिनेमात नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशा दमदार स्टारकास्ट या सिनेमात आहे. 'फॅमिलीचा सिनेमा बघा फॅमिली बरोबर' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. सिनेमाचं पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा विनोदी असून काहीतरी भन्नाट विषय घेऊन येणार असे पोस्टरवरून दिसते आहे.

Web Title: Shreyas Talpade Shared Poster About His New Movie Apadi Thaapdi Released Date Cast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..