‘टीमॉन’ला श्रेयसचा आवाज 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 June 2019

मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे ‘द लायन किंग’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी टीमॉनच्या भूमिकेला आवाज देणार आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे ‘द लायन किंग’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी टीमॉनच्या भूमिकेला आवाज देणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यनही आवाज देणार आहे.

आर्यन या चित्रपटात सिम्बा या पात्रासाठी आवाज देणार आहे. ‘द लायन किंग’मध्ये सिम्बा आणि टीमॉन ही दोन पात्रं सख्खे मित्र दाखवण्यात आले आहेत. ‘द लायन किंग’चा हिंदी रिमेक येत्या १९ जुलैला भारतात प्रदर्शित होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shreyas Talpade voice to Timon