Shreyas Talpade: 'अब रुल पुष्पा का…', श्रेयस तळपदेची अल्लू अर्जूनसाठी खास पोस्ट व्हायरल..

Shreyas Talpade
Shreyas TalpadeEsakal

टॉलीवूडचा सुपर स्टार अल्लु अर्जून हा केवळ साउथ चित्रपटा पुरताच मर्यादित राहिला नसून त्याची क्रेझ ही जगभर पसरली आहे.

अल्लु अर्जूनचं नाव घेतलं तर आधी डोळ्यासमोर यायचा तो लकी द रेसर मधला कुल ड्यूड, नाहीतर अला वैकुंठप्रेमुलु मधलं त्याच फनी कॅरेक्टर.. पण आता अल्लू अर्जून म्हटल तर आठवतो लुंगीमधला पायाची घडी घालून दाडीवर हात फिरवत 'मैं झूकेगा नही साला' म्हणणारा 'पुष्पा'..

Shreyas Talpade
Pushpa 2 Teaser: 'पुष्पा जिंदा है! 'पुष्पा 2'चा दुसरा धमाकेदार टीझर रिलीज.. अल्लू अर्जुनचा रावडी लूक रिव्हिल..

त्याच्या पुष्पा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. बॉक्सऑफिसवर प्रचंड कमाई करत या चित्रपटानं बॉलीवूडचा तगडे आव्हानही दिले होते. येत्या काही दिवसांत त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

अल्लू अर्जुनचा २०२१ साली आलेला 'पुष्पा' चित्रपट पाहिला असेल. यामध्ये रश्मिका मंदान्ना लीड रोलमध्ये होती. तर समंथा रुथ प्रभू या चित्रपटात एक आयटम नंबर पाहायला मिळाली. एकूणच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला.

आता शुक्रवारी या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीली आला. अल्लू अर्जूनच्या वाढदिवसानिमीत्त त्याने त्याच्या चाहत्यांना ही खास भेट दिली. काही क्षणातच तो व्हायरल झाला.

Shreyas Talpade
Madhuri Dixit: 'गुड फ्रायडे' च्या शुभेच्छा देऊन फसला माधुरीचा नवरा...नेटकऱ्यांनी भरवली शाळा

मात्र पुष्पाच्या या कमाईत थोडा वाटा आपल्या महाराष्ट्राचाही आहे. हे विसरुन चालणार नाही. त्याच श्रेय जात ते श्रेयस तळपदेला.

‘पुष्पा’ या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी त्याने आवाज दिला. त्यानंतर हा आवाज तुफान व्हायरल झाला. पुष्पाच्या दुसऱ्या भागालाही श्रेयस त्याचा आवाज देणार आहे.

अल्लू अर्जूनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दरम्यान श्रेयसनेही अल्लू अर्जूनला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Shreyas Talpade
Shah Rukh Khan: शाहरुख पुन्हा ठरला 'बादशाह'! लियोनेल मेसी-मार्क जुकरबर्ग यांना मागे टाकत बनवला नवा रेकॉर्ड

यावेळी पोस्ट शेअर करत श्रेयसने पुष्पा 2 चा टीझरही शेअर केला. या पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये श्रेयसने लिहिलं की , “अब रुल पुष्पा का… और पुष्पा कभी झुकेगा नही साला… अल्लू अर्जुनजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

पुढे तो लिहितो, तुमचा आजचा दिवस आणि येणारी सगळी वर्ष या टीझरसारखीच सुपरहिट जावो.

मजेशीर गोष्ट म्हणजे, एक दिवस मी ती शेवटची ओळ डब करण्यासाठी गेलो आणि पुन्हा सर्व आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. किती सुंदर अनुभव होता तो!”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com