श्रिया खूपच बिझी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया पिळगावकर आपल्याला अनेक लघुपट आणि जाहिरातींमध्ये दिसत असते. तिने शाहरूख खानबरोबर "फॅन'मध्येही काम केलं होतं. फॅनमुळे तिच्या करियरला कलाटणी मिळाली आणि तिला बॉलीवूड तसेच छोट्या पडद्यावर अनेक ऑफर्स येऊ लागल्या.

त्यामुळे तिचं शेड्युल खूपच बिझी झालं आहे. श्रियाला "स्टार प्लस'वरील नवीन मालिका "मरियम खान- रिपोर्टिंग लाईव्ह' या मालिकेसाठी विचारण्यात आलं होतं. या मालिकेत मरियमची आई मदिहा म्हणजेच रूखसार रेहमान यांची मोठी मुलगी मेहेरच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. पण आधीच खूप काम असल्याने तिनं चक्क या मालिकेसाठी नकार दिला. ही मालिका स्टार प्लसवर लवकरच सुरू होणार आहे. निर्मात्यांना अजूनही ती या शोमध्ये यावी असं वाटत आहे. त्यांनी फिंगर्स क्रॉसच करून ठेवले आहेत. श्रियाचं मन वळलं तर कदाचित श्रिया या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करीलही. 

Web Title: shriya is very busy in her schedule

टॅग्स