esakal | Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'
sakal

बोलून बातमी शोधा

Shruti Haasan

Shruti Haasan : 'बरं झालं आईबाबांनी घटस्फोट घेतला'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री श्रुती हासन Shruti Haasan ही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत व्यक्त झाली. "आईबाबांचा घटस्फोट झाला, ते एका अर्थाने बरंच झालं", अशी प्रतिक्रिया तिने दिली. जवळपास १६ वर्षांच्या संसारानंतर कमल हासन Kamal Haasan आणि सारिका Sarika विभक्त झाले. १९८८ मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं आणि २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. (Shruti Haasan is glad her parents Kamal Haasan and Sarika are separated)

'झूम' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रुती म्हणाली, "एका अर्थाने बरंच झालं की त्यांनी घटस्फोट घेतला. कारण जर दोन लोकांचं एकमेकांशी पटत नसेल तर केवळ लग्नाच्या कारणामुळे त्यांना एकत्र राहण्यासाठी बळजबरी करू नये असं मला वाटतं. पण दोघंही खूप चांगले पालक आहेत. दोघांच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत पण एकमेकांसाठी ते ठीक नाहीत. यामुळे माणूस म्हणून त्यांच्यातील चांगुलपणा अजिबात कमी होत नाही. मी लहान असताना ते दोघं विभक्त झाले. एकत्र राहताना ते तेवढे खूश नव्हते, जेवढे घटस्फोट झाल्यानंतर आहेत."

हेही वाचा: लग्नाच्या १७ वर्षांनंतर 'CID' फेम हृषिकेशचा घटस्फोट; म्हणाला, 'इतकी वर्षे गप्प होतो कारण..'

२००२ साली कमल हासन आणि सारिका यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर दोन वर्षांनी हे दोघं विभक्त झाले. या दोघांना श्रुती आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत.