esakal | सिद्धार्थ-मितालीने लग्नानंतर निवडलं महाराष्ट्रातील 'हे' सुंदर ठिकाण; जाणून घ्या किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

siddharth chandekar and mitali mayekar

 

मालदीव किंवा देशाबाहेरील इतर ठिकाणांना सेलिब्रिटींची पसंती असताना सिद्धार्थ-मितालीने महाराष्ट्रातील एक सुंदर ठिकाण निवडलं. 


सिद्धार्थ-मितालीने लग्नानंतर निवडलं महाराष्ट्रातील 'हे' सुंदर ठिकाण; जाणून घ्या किंमत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी फिरण्यासाठी, जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी मालदीव किंवा देशाबाहेरील इतर ठिकाणांना पसंती दिली. नवविवाहित अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी लग्नानंतर एकमेकांसोबत निवांत क्षण घालवण्यासाठी महाराष्ट्रातील एक सुंदर ठिकाण निवडलं. या निसर्गरम्य ठिकाणाचे फोटो या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 

हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या लोणावळ्यातील 'द मचान' या रिसॉर्टमध्ये सिद्धार्थ आणि मिताली गेले आहेत. त्यांचे सोशल मीडियावरील फोटो पाहून तुम्हालाही तिथे जाण्याचा मोह आवरणार नाही. या रिसॉर्टच्या रचनेची काही खास वैशिष्ट्ये आहेत. राहण्याच्या आरामदायी व्यवस्थेसोबतच रिसॉर्टचं 'हेरिटेज' इंटेरिअर विशेष लक्ष वेधून घेतं. 

हेही वाचा : अभिज्ञा भावेच्या अनोख्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर चर्चा 

या रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी 'वूड्स', 'केबिन', 'जंगल मचान', 'सनसेट मचान', 'हेरिटेज मचान', 'स्टारलाइट मचान', 'फॉरेस्ट मचान' आणि 'कॅनोपाय मचान' अशा आठ वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. 'वूड्स'मध्ये राहण्याची किंमत एका व्यक्तीसाठी ९५०० रुपयांपासून सुरुवात होते, 'केबिन'मध्ये एका व्यक्तीसाठी ११ हजार रुपयांपासून सुरुवात होते, 'जंगल मचान'मध्ये १३ हजारांपासून सुरुवात, 'सनसेट मचान'मध्ये १५ हजार ५०० पासून सुरुवात, 'हेरिटेज मचान' आणि 'स्टारलाइट मचान'मध्ये २५ हजारांपासून सुरुवात, 'फॉरेस्ट मचान'मध्ये १३ हजारांपासून सुरुवात आणि 'कॅनोपाय मचान'मध्ये १४ हजार ५०० रुपयांपासून सुरुवात होते.