'प्रजासत्ताक दिन माझ्यासाठी लकी';असं का म्हणाला सिद्धार्थ चांदेकर? Siddharth Chandekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Chandekar

'प्रजासत्ताक दिन माझ्यासाठी लकी';असं का म्हणाला सिद्धार्थ चांदेकर?

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर(Siddharth Chandekar) सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो आपली बायको मिताली मयेकरसोबतचे वेगवेगळे फनी व्हिडीओ तिथे शेअर करीत असतो ज्याला लाखोंनी व्ह्युज मिळतात. नुकतेच गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या लग्नाच्या फोटोत-व्हिडीओत त्यांचे बेस्ट फ्रेंड्स असलेले सिद्धार्थ-मिताली तुफान धम्माल करताना दिसत आहे. बरं ते लग्न आता दोनच दिवसांपूर्वी पुण्यात झालं. पण त्या लग्नानंतर लागलीच सिद्धार्थनं मध्यप्रदेश गाठलं. यंदाचा प्रजासत्ताक दिन त्यानं विशेष प्रकारे साजरा करण्याचं ठरवलं होतं. आणि त्यासाठीच त्यानं स्वतःसाठी एक डे प्लान आखून ठेवला होता. काय होतं ते निमित्त? तो डे प्लान? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर.

मागे सकाळ पॉडकास्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत सिद्धार्थनं मितालीमुळे आपल्याला काही चांगल्या गोष्टींची सवय लागली आहे असं म्हटलं होतं. त्या चांगल्या गोष्टीत त्यानं जंगल सफारी करण्याचा छंद आपल्याला मितालीमुळे जडला असं तो म्हणाला होता. या दोघांच्या जंगल सफारीच्या व्हिडीओ पोस्ट्स आपण याआधी पाहिल्याच असतील. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं सिद्धार्थनं जंगल सफारीचं प्रयोजन केलं होतं. त्यासाठी तो थेट पोहोचला मध्यप्रदेशातल्या 'कान्हा नॅशनल टायगर रीझर्व्ह फॉरेस्ट'मध्ये. त्यानं तिथल्या सफारी दरम्यान अगदी सकाळच्या प्रहरी काढलेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्या फोटोत एक वाघीण त्याच्या गाडीच्या समोर आली आहे अन् त्यानं लगेच तिला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलं आहे. त्यानं या फोटोला कॅप्शन दिलंय, ''प्रजासत्ताक दिनी या राष्ट्रीय प्राण्याला समोरून भेटण्याचा आनंद काही औरच''. काहीही असो,आजच्या शुभ दिनी दुर्मिळ गोष्ट पाहण्याचं भाग्य लाभणं म्हणजे खरंच परमानंद. बरं याचसाठी केला होता अट्टाहास ते पू्र्ण होणं म्हणजे अहम भाग्य.

Web Title: Siddharth Chandekar Republic Day Celebrationread Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top