esakal | सिद्धार्थ चांदेकरची 'सांग तू आहेस का' मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थ चांदेकरची 'सांग तू आहेस का' मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

सिद्धार्थ चांदेकरची 'सांग तू आहेस का' मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सांग तू आहेस का' Sang Tu Aahes Ka ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीच्या यादीतही चांगली कामगिरी करणारी ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेच्या कथानकातील रंजक वळणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. मात्र आता ही मालिका संपणार असून प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं शेवटच्या काही भागांमध्ये मिळणार आहेत.

या मालिकेची कथा स्वराज या सुपरस्टारच्या आयुष्याभोवती फिरते. स्वराजच्या पत्नीच्या अचानक मृत्यूनंतर त्याच्या आयुष्यात दु:खद वळण येतं. पत्नीच्या मृत्यूचा धक्का तो सहन करू शकत नाही. त्याला सतत त्याच्या आसपास पत्नीचं अस्तित्व जाणवत राहतं. त्यानंतर स्वराजच्या आयुष्यात वैभवी येते आणि ती स्वराजच्या पत्नीच्या आकस्मिक मृत्यूमागचं कारण शोधू लागते. मालिकेच्या शेवटच्या काही भागांत प्रेक्षकांना कथेतील रहस्य उलगडून दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: गायत्री दातार ते चिन्मय उदगीरकर.. संभाव्य स्पर्धकांची यादी

वैभवी आणि स्वराज यांच्यामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली होती. 'आ क्षणा आ नंतरा' या कन्नड मालिकेचा हा मराठी रिमेक आहे. यामध्ये सिद्धार्थ चांदेकरने स्वराजची भूमिका साकारली, तर अभिनेत्री शिवानी रांगोळे ही वैभवीच्या भूमिकेत आहे. सानिया चौधरीने मालिकेत सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

loading image
go to top