

झी मराठी वाहिनीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav). सिद्धार्थ हा एक अष्टपैलू कलाकार आहे पण आता तो किचन कल्लाकारच्या मंचावर येऊन आपली पाककला दाखवण्याचं शिवधनुष्य पेलवू शकेल की नाही हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. (Mast Majjedar Kitchen Kallakar)
सिद्धार्थला महाराज तांबडा पांढरा रस्सा बनवण्याचं आव्हान देणार आहेत. त्यावर सिद्धू आश्चर्यचकित होऊन आता काय करू आणि काय नको अशी प्रतिक्रिया देतो. आता सिद्धूला किचनमध्ये तांबडा पांढरा रस्सा बनवायला जमेल की महाराजांना एखादा वेगळाच पदार्थ खायला मिळेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
इतकंच नव्हे तर या आठवड्यात किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे सांभाळणार आहे. सिद्धूसोबत या आठवड्यात सुयश टिळक, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड आणि भाऊ कदम हे कलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा आगामी भाग १९ आणि २० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.