लाईट,साऊंड,कॅमेरा अ‍ॅन्ड अ‍ॅक्शन; नवाझुद्दीन सिध्दिकी पुन्हा एकदा सेटवर

Siddiqui would love to face the camera again but doesn’t want to rush ahead
Siddiqui would love to face the camera again but doesn’t want to rush ahead

मुंबई - कोरोनाचा काही केल्या कमी होत नाहीये अशावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न सुरु आहेत. यात बॉलीवूडही राहिलेल्या चित्रपटांचे चित्रिकरण पुर्ण करण्यासाठी मार्ग काढताना दिसत आहे. आता अनेकांनी आपल्य़ा नियमित कामांना सुरुवात केली असून प्रख्यात अभिनेता नवाझुद्दीन सिध्दिकीने इंस्टावर याबद्दल एक पोस्ट शेयर केली आहे.

आपण कुठल्याही प्रकारचा धोका पत्करुन शुटिंग सुरु केलेले नाही. मागील अनेक महिन्यांपासुन कोरोनामुळे जी परिस्थिती आहे त्याचा गंभीर परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. बॉलीवूडही त्याला अपवाद नसल्याचे नवाझुद्दीनने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सिरीयस मॅन नावाचा नवाझुद्दीनचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. अनेकांनी या वेगळ्या विषयावरील चित्रपटाचे स्वागत केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सध्या मोठ्या प्रमाणावर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Done for the day !!!

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

विशेष म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यावर प्रदर्शित होणा-या  चित्रपट व मालिकांची संख्या लक्षणीय आहे. हा धागा पकडून नवाझुद्दीन म्हणतो, कोरोना असला तरी बॉलीवूड त्याचा सामना करण्यासाठी तयार आहे. एक कलाकार म्हणून मला आता सेटवर जाणे भाग आहे. मात्र हे सगळे करताना पुरेशी काळजी घेणे महत्वाचे आहे. सध्याचे वातावरण पाहता सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. नवाझुद्दीन आता कुशन नंदी यांच्या जोगीरा सारा रा रा चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. आणखी अनेक चित्रपटांचे चित्रिकरण कोरोनामुळे रखडले असून थोड्याफार प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागणार आहे. 

माझा येणारा चित्रपट हा कुठल्याही एका विशिष्ट स्थानावर आधारित नाही. त्यामुळे मी कुठल्याही ठिकाणी चित्रिकरण करु शकतो. नवाझुद्दीनने लॉकडाऊन मधील बराचसा काळ हा उत्तर प्रदेशातील बुढाना आणि डेहराडून (नवाझुद्दीनच्य़ा भाऊ राहत असलेले गाव) या गावांमध्ये व्यतीत केला आहे. मागील सहा महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट आणि वेब मालिका प्रदर्शित होत आहेत. सध्याच्या कालावधीत नवाझुद्दीनचा घुमकेतू, रात अकेली है आणि सीरियस मॅन नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com