'कबीर तुझ्या प्रीतीला शेरशाहनं रंगवलं!' | Sidharth-Kiara Advani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth-Kiara Colorful

Sidharth-Kiara Colorful : 'कबीर तुझ्या प्रीतीला शेरशाहनं रंगवलं!'

Glimpse from first Holi with wife Kiara Advani : शेरशाहमध्ये त्यांचे प्रेम बहरून आले. त्या प्रेमानं दोघांना एकत्र आणले. काही दिवसांपूर्वीच मोठ्या धुमधडाक्यामध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. सध्या प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि तिचा पती शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा यांचे धुलवडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच कियारा आणि सिद्धार्थचं शुभमंगल पार पडलं खरं पण त्यानंतर त्यांच्या फोटोंना मिळालेला प्रतिसाद मोठा होता. चाहत्यांना काही करुन आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या लग्नाचे फोटो पाहायचे होते. अशावेळी त्यांनी कियारा-सिद्धार्थचे फोटो व्हायरल होताच त्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. आता पुन्हा हे कपल चर्चेत आले आहे.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

धुलिवंदनाच्या निमित्तानं बॉलीवूडमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावऱण असल्याचे दिसून आले आहे. रंगोत्सव साजरा करण्याची मोठी परंपरा बॉलीवूडमध्ये आहे. बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींच्या घरी होळी आणि धुलिवंदनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पूर्वीपासून दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या निवासस्थानी धुळवडीसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते.

आता बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेतील चेहरा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या पहिल्या धुळवडीचे, होळीचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील भलत्याच भन्नाट आहे. काही चाहत्यांनी सेलिब्रेटींच्या त्या फोटोवर कमेंट करताना त्याचा संबंध कबीर सिंगशी जोडला आहे.त्या चित्रपटामध्ये प्रीती फेम कियाराला दुसऱ्या व्यक्तीनं रंग लावल्यानंतर कबीर त्याची धुलाई करतो. असा प्रसंग आहे.

आता प्रीतीला शेरशाह फेम सिद्धार्थनं रंग लावला आहे. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर कियारा अडवाणी हा ट्रेडिंगचा विषय आहे. त्यावर या दोन्ही सेलिब्रेटींचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.