esakal | सिद्धार्थच्या निधनानंतर रश्मी देसाई का होतेय ट्रोल?
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धार्थच्या निधनानंतर रश्मी देसाई का होतेय ट्रोल?

सिद्धार्थच्या निधनानंतर रश्मी देसाई का होतेय ट्रोल?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं काल हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्याच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचं जाणं हे अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर आता त्याच्या सहकाऱ्यांना ट्रोल केलं जात असल्याचे दिसून आलं आहे. त्यात त्याची बिग बॉसची माजी सहकारी रश्मी देसाईला युझर्सनं सोशल मीडियावरुन ट्रोल केलं आहे. दिल से दिल तक नावाच्या मालिकेमध्ये त्या दोघांनी एकत्र काम केले होते. तिला तिच्या काही गोष्टींची जाणीव त्यातून करुन दिली आहे.

गुरुवारी सिद्धार्थनं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मेडिकल रिपोर्टवरुन सध्या वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे. अखेर त्यावर डॉक्टरांनी आपलं स्पष्टीकरणही दिलं आहे. त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारची इजा नसल्याचे दिसून आलं आहे. मात्र अनेकांनी त्याबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर पोस्टही शेयर केल्यानं त्या चर्चेला उधाण आलं आहे. टेलिव्हिजन मनोरंजन क्षेत्रामध्ये सिद्धार्थनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या सिद्धार्थनं वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये काम केलं होतं.

रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लानं जवळपास तीन वर्ष एकत्र काम केलं. त्यावेळी त्यांच्यात झालेला वादही मनोंरंजन क्षेत्रात प्रसिद्ध आहे. सध्या सिद्धार्थच्या जाण्यानं तिला मोठा धक्का बसला आहे. तिनं सोशल मीडियावर एक इमोजी शेयर करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र तसे करताना तिनं सिद्धार्थचं नावही लिहिलेलं नाही. त्यामुळे युझर्सनं नाराजी व्यक्त केली आहे.

रश्मीनं जेव्हा तो इमोजी शेयर केला तेव्हापासून तिला सोशल मीडियावर ट्रोलिंग केलं जात आहे. काहींनी तिला बिग बॉसमधील त्या एका एपिसोडची आठवण करुन दिली आहे. काहींनी तिला दोष देण्यास सुरुवात केली आहे. एवढचं नाही तर बिग बॉसमध्ये असताना तिनं सिद्धार्थविषयी जे वक्तव्य केलं होतं त्याची आठवणही करुन दिली आहे. बिग बॉसमध्ये सिद्धार्थ आणि रश्मीमध्ये मोठा वाद झाला होता. त्यांचा तो वाद तेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांनी एकमेकांवर आरोप केले होते. त्यावेळी रश्मी त्याला म्हणाली होती की, या माणसाला जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हा त्याला मी पाणीही देणार नाही. तेव्हा त्याचे काहीही झालं तरी चालेल. या विधानाची ट्रोलर्स आठवण करुन देत आहे.

loading image
go to top