Sidhu Moosewala : 'सिद्धु मुसेवाला' चा फोटो असलेल्या पतंगची किंमत माहितीये? अजुनही नावाचा आहे मोठा डंका!

लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला याची दोन वर्षांपूर्वी २९ मे २०२२ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
Sidhu Moosewala Makar Sankranti Special
Sidhu Moosewala Makar Sankranti Specialesakal

Sidhu Moosewala Makar Sankranti Special : लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला याची दोन वर्षांपूर्वी २९ मे २०२२ रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याची लोकप्रियता त्याच्या मृत्यूनंतरही कायम आहे. त्याच्या गाण्यांना मिळणारी पसंती सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

या सगळ्यात मकर संक्रांतीच्या निमित्तानं सिद्धू मुसेवालाचं नाव अन् त्याचा फोटो असलेल्या पतंग याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सिद्धुनं त्याच्या करिअरमध्ये एकुण १४२ गाणी गायली होती. त्याचा चाहतावर्ग मोठा होता.

लाखोंच्या किंमतीत विकल्या जातात पतंग...

मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग उडविण्याची प्रथा अनेक राज्यांमध्ये आहे. यावेळी बॉलीवूडमधील सेलिब्रेटींचे फोटो असलेल्या पतंग अनेकांच्या आवडीचा विषय असतो. मात्र या सगळ्यात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचा फोटो असलेल्या पतंगांना देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. या पतंगांसाठी त्याचे चाहते लाखो रुपयेही मोजतात. जनसत्तानं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे.

मीडिया रिपोर्टसनं दिलेल्या माहितीनुसार शाहरुख अन् सलमान सोबत सिद्धु मुसेवालाचा फोटो असलेल्या पतंग खूपच लोकप्रिय आहेत. त्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. अशावेळी त्याचे चाहते वाट्टेल ती किंमत देऊन त्याचा फोटो असलेली पतंग विकत घेतात. अशा पतंगेची किंमत काही हजारांपासून लाख रुपयांपर्यत असल्याचे दिसून आले आहे.

सिद्धूचे काही चाहते तर पतंग तयार करणाऱ्यांना त्याचा फोटो छापून देण्याची विनंती करत स्पेशल ऑर्डरही देत आहेत. त्याचं नाव आणि फोटो असलेल्या पतंग आम्हाला हव्या आहेत, त्याची मोठी मागणी असल्याचे काही दुकानदार सांगतात.

मृत्यूनंतर तीन गाणी झाले होते प्रदर्शित...

सिद्धु मुसेवाला हा त्याच्या आगळ्या वेगळ्या प्रकारच्या गायकीसाठी चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. त्याचा चाहतावर्ग देशभरात सगळीकडे पसरल्याचे दिसून आले आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याची तीन गाणी प्रदर्शित झाली होती. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मृत्यूनंतर काही आठवड्यातच त्याचे युट्युबवर एसवाईएल नावाचे गाणे व्हायरल झाले होते. त्याला एका तासांत एक मिलियन व्ह्युज मिळाले होते.

त्यानंतर मुसेवालाचे वार नावाचे गाणे त्याच्या मृत्यूच्या चार महिन्यानंतर आले होते. त्यालाही काही वेळेतच चार मिलियन व्ह्युज मिळाले होते. त्याबरोबरच मेरे ना....नावाचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. हे गाणं सिद्धुच्या मृत्यूनंतर वर्षभराने प्रदर्शित झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com