Sikandar Kher : '४२ वर्षांचा झालास, लग्न कधी करणार'? लाडक्या लेकाला अनुपम अन् किरण खेर यांचा प्रश्न, लेकानं काय दिलं उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेता सिकंदर खेर याला किरण खेर आणि अनुपम खेर हे लग्न करण्याची विनंती करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.
Sikander Kher Reaction on wedding Anupam kher Kiran kher
Sikander Kher Reaction on wedding Anupam kher Kiran kheresakal

Sikander Kher Reaction on wedding Anupam kher Kiran kher : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असणारे सेलिब्रेटी आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा बहुमान खेर यांच्याकडे जातो. आता ते एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सिकंदर खेर याला किरण खेर आणि अनुपम खेर हे लग्न करण्याची विनंती करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. शेवटी सिकंदरला जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्यानं दिलेल्या उत्तरानं खेर यांना धक्का बसला होता. आर्या ३ नंतर सिकंदर खेर हे चर्चेत आले आहे. त्याच्या दमदार अॅक्टिंगने चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

सिकंदरनं आता लग्न करावे अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे. गेल्याच महिन्यात त्यानं ४२ वर्षे पूर्ण केली आहेत. अशावेळी किरण खेर आणि अनुपम खेर यांनी केलेल्या विधानानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सिकंदरनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले आहे. सिकंदरला जेव्हा त्याच्या लग्नावरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं त्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे.

सिकंदर त्या प्रश्नावर म्हणतो की, लग्नावरुन मला अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. आता त्याप्रश्नावर मी मोठी स्क्रिप्टच लिहितो आहे. मला माहिती आहे की आई वडील माझ्यावर त्या लग्नाच्या प्रश्नावरुन खूप दवाब आणत आहेत. आणि मला त्यांची चिंता समजू शकते. त्यांना असे वाटते की, म्हातारपणात मी एकटा पडू नये. म्हणून ते मला लग्नासाठी आग्रह करत असल्याचे दिसून आले आहे.

Sikander Kher Reaction on wedding Anupam kher Kiran kher
Shah Rukh Viral Video : दिल जीत लिया ! आशाताईंसाठी केलेल्या किंग खानच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

लग्न ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि मी त्याकडे एखाद्या मोठ्या टास्कच्या रुपात पाहतो. त्यामुळे मला जी जबाबदारी स्विकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या खंबीर राहावे लागेल. माझं आयुष्य माझं प्रेम यासाठीचे माझे विचार खूपच वेगळे आहेत. मला केवळ नावाला लग्न करायचे नाही आणि कुणाला धोकाही द्यायचा नाही. अशा शब्दांत सिकंदरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com