'सिम्बा' पुन्हा येतोय.. आता शाहरुख-आर्यनच्या आवाजात! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

'मैं हू सिम्बा.. मुफासा का बेटा..' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आवाजातील 'द लायन किंग'चा नवा टीझर आज (गुरुवार) झळकला. विशेष म्हणजे, शाहरुख आणि आर्यन या दोघांच्याही आवाजातील फरक चटकन ओळखू येण्यासारखा नाही. सोशल मीडियावरही असंख्य युझर्सने अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

मुंबई : 'मैं हू सिम्बा.. मुफासा का बेटा..' शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आवाजातील 'द लायन किंग'चा नवा टीझर आज (गुरुवार) झळकला. विशेष म्हणजे, शाहरुख आणि आर्यन या दोघांच्याही आवाजातील फरक चटकन ओळखू येण्यासारखा नाही. सोशल मीडियावरही असंख्य युझर्सने अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

'डिस्ने'च्या नव्या 'द लायन किंग'च्या हिंदी आवृत्तीमध्ये अनेक दिग्गजांनी व्हॉईस ओव्हर दिला आहे. त्यात शाहरुखचाही समावेश आहे. शाहरुखने 'द लायन किंग'मध्ये मुफासाच्या पात्राला, तर आर्यनने 'सिम्बा'साठी आवाज दिला आहे. आर्यनने यापूर्वी 'द इन्क्रेडिबल्स'मधील 'डॅश' या पात्रासाठी आवाज दिला होता. त्या ऍनिमेशनपटात शाहरुखने 'मिस्टर इन्क्रेडिबल्स' हे पात्र आवाजाने जिवंत केले होते. 

'द लायन किंग'मध्ये आशिष विद्यार्थी, श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि असरानी यांचाही समावेश आहे. हा ऍनिमेशनपट येत्या 19 जुलै रोजी झळकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simba trailer releases Shah Rukh Khan and Aryan Khan to give voices