esakal | चाहत्यांची उत्सुकता संपली, अमृताताईंचे 'वेडी कुठली' गाणे प्रदर्शित  
sakal

बोलून बातमी शोधा

singer Amruta fadnavis new song released on social media name kuni mhanale womens day

केवळ सांस्कृतिक नव्हे तर वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींमध्येही अमृताजींचा सक्रिय सहभाग यापूर्वी दिसून आला आहे.

चाहत्यांची उत्सुकता संपली, अमृताताईंचे 'वेडी कुठली' गाणे प्रदर्शित  

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - महिला दिनाच्या निमित्तानं अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित होणार होते. त्यानुसार ते गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आतापर्यत त्याला 9 हजार लाईक्सही मिळाले आहेत. अमृता यांनी सोशल मीडियावर आपले गाणे प्रसिध्द होणार असल्याचे सांगितले होते. त्या दिवसांपासून चाहत्यांना त्यांच्या त्या नव्या गाण्याचे वेध लागले होते. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे गाणे सध्या चाहत्यांच्या आवडीचा विषय ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधीपक्ष नेते असणा-या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी  अमृताजींचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. येणा-या महिला दिनी त्यांचे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यांनीच ही माहिती व्टिट करुन दिली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून ताईंचे गाणे ऐकण्यासाठी चाहते उत्सुक होते.

केवळ सांस्कृतिक नव्हे तर वेगवेगळ्या सामाजिक गोष्टींमध्येही अमृताजींचा सक्रिय सहभाग यापूर्वी दिसून आला आहे. समाजात होत असलेल्या चूकीच्या गोष्टींवर परखड मत व्यक्त करणे ही त्यांची ओळख आहे. ठाम भूमिका घेण्यासाठीही त्या प्रसिध्द आहेत. जेव्हा अमृता यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली त्यावेळी त्यांना काही जणांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. अमृता यांच्या या अगोदरच्या गाण्याच्या व्हिडिओजच्यावेळी देखील त्यांना अशाच प्रकारे ट्रोल केले गेले होते. कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी !’, असे म्हणत अमृता फडणवीसांनी आपल्या नव्या गाण्याबद्दल सोशल मीडियावर सांगितले आहे.

या गाण्यामध्ये  एक कुटुंब दाखवलं गेलं आहे. या कुटुंबातील लहान मुलगी सुंदरपणे हार्मोनियम वाजवत आहे. आई वडिलांचा पाठींबा मात्र, आजोबांच्या धाकामुळे लोककलेत भाग घेऊ शकत नसलेल्या एका मुलीची कथा या गाण्यात दाखवण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. 
 

loading image