भजन सम्राट अनूप जलोटा जसलीच्या 'नादाला'; व्हिडीओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anup jalota

67 वर्षांचे अनुप सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या वेगवेगळ्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असतात.

भजन सम्राट अनूप जलोटा जसलीच्या 'नादाला'; व्हिडीओ व्हायरल

मुंबई- गायक अनुप जलोटा गायनासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. 67 वर्षांचे अनुप सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या वेगवेगळ्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. अनूप आणि जसलीन मथारू एकमेकांना डेट करत आहेत. बिग बॉस सिझन-12 मध्ये  हे दोघे पार्टनर म्हणून आले होते. तेव्हा त्यांच्या लव्ह स्टोरीची चर्चा सोशल मिडीयावर झाली. अनुप आणि जसलीन या जोडीचा नुकताच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अनुप आणि जसलीन दोघेही सोशल मिडीयावर सक्रिय असतात. जसलिनने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जसलिनसाठी अनुप  'मुझे जब से हुआ है प्यार' हे गाणे म्हणत आहेत. अनुप यांनी गायलेले हे गाणे ऐकून जासलिन स्मित हास्य देत डान्स करताना दिसत आहे. या जोडीच्या या खास व्हिडीओला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एका नेटकऱ्याने या व्हिडीओला कमेंट करत लिहीले, 'वाह जलोटा जी वाह...' तर दुसऱ्याने लिहीले,'बहुत ही अच्छा... '   
 
अनुप आणि जसलीन यांच्या या व्हिडीओमधील सॉंग सिलेक्शन आणि जासलिनच्या हावभावामुळे या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. लवकरच एका चित्रपटामधून अनूप आणि जसलीन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

अनूप जलोटांना भजन सम्राट म्हणले जाते. त्यांनी गायलेली भजने लोक आजही ऐकतात. तसेच जसलीने देखील 11 वर्षाची असल्यापासून शास्त्रीय संगीत आणि पश्चिमी संगीत शिकायला सुरूवात केली.

Web Title: Singer Anup Jalota Sings Song Mujhe Jab Se Hai Pyar Jasleen Matharu React Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..