esakal | 'मी जिवंतच, अफवांवर विश्वास ठेऊ नका' ...
sakal

बोलून बातमी शोधा

Singer Lucky Ali

'मी जिवंतच, अफवांवर विश्वास ठेऊ नका'....

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई- सुप्रसिध्द गायक लकी अली (Lucky Ali) यांचे निधन झाल्याची अफवा मंगळवारी सोशल मीडीयावर व्हायरल झाली होती. लकी अली त्यांच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत होते. पण काही दिवसांपासून ते सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. लकी अली यांच्या अनेक चाहत्यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली होती. परंतू त्याच्या निधनाचा ठोस पुरावा किंवा बातमी कुठेच नव्हती. यासर्वाचा खुलासा करत लकी अलीच्या मैत्रिण नफीसाने ट्विटरवर ट्विट करून केला होता. आता स्वत: लकी अलीने सोशल मीडियावर पोस्ट करून या अफवा असल्याचे सांगितले आहे.

लकी अलीने (Lucky Ali) पोस्टमध्ये लिहिले, ‘नमस्कार, सध्या सोशल मीडियावर माझ्या निधनाच्या अफवा सुरु आहेत. त्यावर मी बोलू इच्छितो. मी घरी शांततेत वेळ घालवत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण देखील काळजी घेत आहात आणि सुरक्षित आहात.' यापूर्वी लकी अली (Lucky Ali) यांची मैत्रिण नफीसा अलीने (Nafisa Ali) ट्विट केले होते ,‘लकी एकदम ठिक आहे. आज दुपारीच आमचे बोलणे झाले. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याला कोरोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती बरी आहे.’

Lucky ali post

Lucky ali post

Lucky ali

Lucky ali

हेही वाचा: अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनानं निधन

हेही वाचा: 'रामायणा'तील 'रावणा'च्या निधनाची अफवा; 'लक्ष्मणा'ने लिहिली पोस्ट

एका मुलाखतीमध्ये नफीसाने सांगितले, 'मी दिवसातून २ ते ३ वेळा लकीशी बोलले. तो बरा आहे. त्याला करोना झालेला नाही. तो त्याच्या म्यूझिक कॉन्सर्टच्या प्लानिंगमध्ये व्यस्त आहे. आम्ही व्हर्चुअल कॉन्सर्टबद्दल देखील बोललो होतो. तो बंगळूरुमध्ये फार्महाऊसवर आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत. मी काही वेळा पूर्वीच त्याच्याशी बोलले.'लकी अली(Lucky Ali) यांनी बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायली आहेत. 'ओ..सनम', 'एक पल का जिना', 'कभी ऐसा लगता है' 'सफर नामा' या लकी अलीच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.