
Mika Singh: 'तेरे जैसा यार कहाँ', मिका सिंगने मित्राला गिफ्ट केली मर्सिडीज कार, किंमत पाहून व्हाल थक्क
प्रसिद्ध गायक मिका सिंग अनेक वर्षांपासून आपल्या गाण्यांनी चाहत्यांचे मनोरंजन करत आहे, आता त्याने आपल्या एका निर्णयाने सर्वांची मने जिंकली आहेत. खरं तर, मिका सिंगने त्याचा बालपणीचा मित्र कंवलजीत सिंगला सुमारे 80 लाख रुपयांची मर्सिडीज कार भेट दिली आहे. मिकाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
मिकाचा मित्र कंवलजीत सिंगनेही मर्सिडीज जीएल क्लास कारचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो आणि मिका सिंग कारसोबत पोज देताना दिसत आहेत. कंवलजीतने आपली ड्रीम कार गिफ्ट म्हणून मिळाली याबद्दल एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे.
त्याने इंस्टाग्रामवर लिहिले, “आम्ही एकत्र राहून 30 वर्षे झाली आहेत. तो माझ्यासाठी फक्त एक मित्र किंवा बॉस नाही तर आम्ही आयुष्यभरासाठी भाऊ आहोत. कंवलजीत सिंहने लिहिले, “पाजी मला माझी आवडती कार भेट दिल्याबद्दल धन्यवाद. हे खरोखरच छान आहे. तुमचे हृदय खूप मोठे आहे. तुमच्याकडून ही भेट मिळाल्याने मला खूप आनंद झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे."
मित्राला एवढे महागडे गिफ्ट दिल्याने मिका सिंगची सर्वत्र चर्चा होत आहे. आपल्या निर्णयावर मिका सिंग म्हणाला, “आपण नेहमी आपल्यासाठी सर्व काही विकत घेतो, पण आपल्यासाठी मेहनत करणाऱ्या लोकांचा विचार करत नाही. माझ्या मित्राला खूप आनंद मिळावा. असे मला वाटते"
सोशल मीडिया यूजर्स मिका सिंगच्या या पावलाचे कौतुक करत आहेत. एका यूजरने मिका सिंगला दिलदार माणूस म्हटले आणि एकाने म्हटले की, तू किंग आहेस. एका यूजरने लिहिले की, "किंग नेहमीच किंग असतो." तर अनेक जण मिका सिंगकडेच कार मागू लागले.